School Kids (Photo credit : commons.wikimedia)

राज्यभरातील शाळांमध्ये सध्या दिवाळी प्रथम सत्राच्या परिक्षा (First Semester Examination) सुरु आहेत. विद्यार्थी जोरदार अभ्यास करुन परिक्षा देत आहेत. तरी ही परिक्षा संपली की विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळणार आहे.  21 ऑक्टोबर पासून दिवाळी (Diwali) सणाला सुरुवात होत असुन विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त यावर्षी तब्बल 18 दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या पंधरा दिवस सुट्ट्या मिळतात पण यावर्षी 18 सुट्ट्याचं दिवाळी बोनसचं (Diwali Bonus) विद्यार्थ्यांना मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही.  दिवाळीची सुरवात 21 ऑक्टोबरपासून होत असल्याने त्य शाळेला 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत सुटी असणार आहे अशी माहिती शिक्षण विभागाकडून (education Department) देण्यात आली आहे पण 8 नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांच्या सुट्टीत आणखी एक दिवसाची भर पडली आहे. म्हणजेचं यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना तब्बल 18 दिवस सुट्टीचा आनंद लुटता येणार आहे.

 

तरी या दिवाळीच्या सुट्टीत (Diwali Holiday) विद्यार्थ्यांना विशेष गृहपाठ (Home Work) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दिवाळी सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निबंध लिहिणे (Eassy Writing) , वाचन सराव (Reading), अंक व अक्षर ओळख (Number and Letter Identification)  याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे. तरी या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना हा गृहपाठ देण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- Medical Education in Hindi: आता चक्क हिंदीतून होणार MBBS चे शिक्षण; गृहमंत्री अमित शाह करणार पुस्तकांचे अनावरण)

 

दिवाळीमुळे शिक्षकांसह (Teachers) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (Maharashtra Government Employee) नोव्हेंबरचे (November) वेतन ऑक्टोबर (October) अखेरीस मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना देखील विशेष दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) मिळणार आहे. तरी दिवाळी पूर्वी शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षकांची बदली प्रक्रीया ही पहिल्यांनादाचं ऑनलाइन (Online) पद्धतीने पार पडणार आहे.