Diamond (PC - Pixabay)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल झाले आहेत. अशातचं मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) एका व्यक्तीचं नशिब उजाडलं आहे. रानीपूर येथील खाण मालकाला चक्क 10.69 कॅरेटचा हिरा (Diamond) सापडला आहे. या हिऱ्याची किंमत सुमारे 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

आनंदीलाल कुशवाहा, असं या खाण मालकाचं नाव आहे. विशेष म्हणजे या खाण मालकाने हा हिरा सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला आहे. यापूर्वीदेखील आनंदी लाकुशवाहा यांना एक हिरा सापडला होता. परंतु, तो येवढा मौल्यवान नव्हता. (हेही वाचा - Rajyasabha MP Oath Ceremony:  शरद पवार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले पुन्हा खासदार; राजीव सातव यांचा दिल्लीत मराठी बाणा)

दरम्यान, आनंदीलाल यांना राणीपूर येथील खाणीमध्ये खोदकाम करताना 10.69 कॅरेटाचा हिरा सापडला. विशेष म्हणजे त्यांनी हा हिरा सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. हिरा कार्यालयातील अधिकारी आर. के. पांडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, या हिऱ्याचा लवकरचं लिलाव केला जाणार असून या हिऱ्याला मिळणाऱ्या किंमतीमधून कर तसेच रॉयल्टीची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम आनंदीलाल यांना दिली जाणार आहे. दरम्यान, आनंदीलाल यांनी सांगितलं की, मागील 6 महिन्यापासून मी आणि माझे कुटुंब या खाणीमध्ये काम करत आहेत. मौल्यवान हिरा सापडल्याने आम्ही आनंदी असल्याचंदेखील कुशवाहा यांनी म्हटलं आहे.