ठळक बातम्या

Maharashtra Assembly Election Results 2024: ठाणे शहरातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय केळकर विजयी, राजन विचारे पराभूत

Amol More

शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे यांचा याठिकाणी दारुण पराभव झाला आहे. मनसेचे अविनाश जाधव या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Eknath Shinde Thanks Voters: 'राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले, हा विजय सर्वसामान्यांचा आहे;' विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Prashant Joshi

एकनाथ शिंदे म्हणतात, ‘विश्वनेते आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पाठबळामुळे जनतेच्या मनातले सर्वसामान्यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊ शकले.

Sarita Fadnavis Reaction to Devendra Fadnavis Victory: 'माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार'; महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Bhakti Aghav

या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महायुतीच्या या विजयावर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'महाराष्ट्र पीएम मोदींच्या पाठीशी हे या निकालातून स्पष्ट' म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मतदारांसह 'लाडक्या बहिणींचे मानले विशेष आभार

Dipali Nevarekar

विरोधकांकडून संजय राऊत यांनी महायुतीचं यश हे 'काहीतरी गडबड' असल्याचं म्हटलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सुनवले आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election Results 2024: एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस; कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

Amol More

राज्यात सध्या भाजपहा 133 जागांवर आघाडी घेवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर शिवसेना शिंदे गटाने 56 जागांवर आघाडी घेत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. स्ट्राईक रेटच्या बाबतीतही भाजपच सर्वात पुढे आहे.

Maharashtra vidhan Sabha Election 2024: कोकणात राणे बंधू विजयाच्या दिशेने; निलेश राणेंना तब्बल 53,000 मताधिक्य

Jyoti Kadam

कोकणात राणे बंधू प्रतिष्ठेची निवडणूक लधवत आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांचे दोन्ही मुलं यंदा आपलं राजकीय भवितव्य पणाला लावून निवडणुकीच्या मैदानात होते. कोकणतील ह्या दोन्ही राणे बंधुसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात कोण जिंकले? कोण आघाडीवर? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) महाविकासआघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) प्रचंड धक्कादायक तर महायुतीसाठी आश्चर्यकारक सकारात्मक लागला आहे. खास करुन मुंबई शहरामध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला.

India vs Australia 1st Test Day 2 Stump: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पर्थ कसोटीवर टीम इंडियाची भक्कम पकड; जैस्वाल-राहुलचे दमदार अर्धशतक

Nitin Kurhe

IND vs AUS: दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 56 षटकात 172 धावा करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 218 धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल 62 तर यशस्वी जैस्वाल 90 धावांवर खेळत आहे.

Advertisement

Kannad Vidhan Sabha Election 2024 Result: पतीवर पत्नी ठरली भारी! कन्नड मतदारसंघातून शिंदे गट शिवसेना उमेदवार संजना जाधव यांच्याकडून हर्षवर्धन जाधव यांचा दारुण पराभव

Bhakti Aghav

संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये संजना जाधव या पहिल्या दिवसापासूनच प्रचाराच्या माध्यमातून आपली बाजू मांडत होत्या. अनेक वर्षापासून त्यांनी गावागावात जाऊन कामाचा झपाटा लावला होता. त्यांच्या कुटुंबातील कलहामुळे त्यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला.

Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या विधासभेत 'विरोधी पक्षनेता' नसणार? महाराष्ट्रावर नामुष्की

Amol More

विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला 29 जागा निवडून येणे आवश्यक असते. परंतू सध्याचे आकडे पाहता महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठणे कठीण जाणार असल्याचे चित्र आहे.

KL Rahul Half Century: केएल राहुलने ठोकले अर्धशतक, टीम इंडियाचा दबदबा कायम

Nitin Kurhe

आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुलने 124 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले आहे. दुसऱ्या डावात भारताचा स्कोर 128/0

Sangamner Assembly Constituency: संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात पराभूत; कॉंग्रेस साठी मोठा धक्का

Dipali Nevarekar

बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे देखील राजकारणामध्ये आहेत. ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024: सांगोल्यात शहाजीबापू पाटलांना धक्का? बाबासाहेब देशमुख आघाडीवर

Jyoti Kadam

सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे दीपक साळुंखे तसेच शेकापचे बाबासाहेब देशमुख मैदानात आहेत.

IPL Mega Auction 2025: मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर लावली जाऊ शकते सर्वात मोठी बोली, मोड शकतात आधीचे सर्व रेकॉर्ड

Nitin Kurhe

या लिलावात अनेक स्टार खेळाडू आणि काही युवा खेळाडूंचाही समावेश आहे, मात्र कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार याकडे सगळ्यांनाच उत्सुकता आहे. यावेळी मागील सर्व विक्रम मोडीत निघतील आणि मिचेल स्टार्कचा विक्रम मागे टाकण्यात कोणताही खेळाडू यशस्वी होईल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ambegaon Assembly Election 2024 Result: शरद पवारांना धक्का! आंबेगाव मतदार संघातून दिलीप वळसे पाटील 1100 मतांनी विजयी

Bhakti Aghav

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा 1100 मतांनी विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांचा दिलीप वळसे पाटील यांच्यावर मोठा रोष होता.

Maharashtra Assembly Election Results 2024: कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी

Amol More

मुंबईत महत्वाच्या लढतीपैकी एक मानल्या जाणाऱ्या कांदिवलीच्या जागेवर अतुल भातखळकर यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.

Advertisement

Yashasvi Jaiswal Half Century: यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, पर्थ कसोटीवर भारताची घट्ट पकड

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू यशस्वीने अर्धशक झळकावले आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: अजित पवारांनी बारामतीचा गड राखला, मोठ्या मताधिक्याने विजय

Amol More

बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला आहे. बारामतीत अजित पवार यांना 91 हजार 228 मत मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेल्या युग्रेद्रं पवार यांना 41 हजार 768 मत प्राप्त झाली आहे

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महायुती सरकार स्थापन करण्याच्या तयारीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष (Watch Video)

Jyoti Kadam

महायुतीने मोठी आघाडी घेतली असून महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. त्याचा जल्लोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुरू आहे. ढोल-ताशाच्या गजरात समर्थक आनंद व्यक्त करत आहेत.

Shevgaon-Pathardi Vidhan Sabha Election 2024 Result: भाजप आमदार मोनिका राजळे यांना धक्का! शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले 4720 मतांनी आघाडीवर

Bhakti Aghav

शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये यावेळी चौरंगी लढत होत असताना बंडखोर हर्षदा काकडे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले त्याचप्रमाणे भाजपा कडून मोनिका राजळे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे असे उमेदवार निवडणूक रिंगणात होते

Advertisement
Advertisement