Eknath Shinde Thanks Voters: 'राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले, हा विजय सर्वसामान्यांचा आहे;' विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

एकनाथ शिंदे म्हणतात, ‘विश्वनेते आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पाठबळामुळे जनतेच्या मनातले सर्वसामान्यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊ शकले.

Eknath Shinde (PC - X/ANI)

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Elections 2024) चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सर्व 288 जागांचे ट्रेंड आले आहेत. राज्यात भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. ते 129 जागांवर पुढे आहेत. महाविकास आघाडीचा दारूण पराभव होताना दिसत आहे, ते केवळ 54 जागांवर पुढे आहेत. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करणाऱ्या एमव्हीएला विधानसभेमध्ये अशा नशिबी सामोरे जावे लागेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदावरून युतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपच्या जागा पाहता, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात विशेष सौदेबाजी करण्याची ताकद नाही, असे म्हणता येईल. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

ते म्हणतात, ‘समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे.’

एकनाथ शिंदेंनी मानले मतदारांचे आभार-

ते पुढे म्हणतात, ‘विश्वनेते आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पाठबळामुळे जनतेच्या मनातले सर्वसामान्यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊ शकले. देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सहकाऱ्याने या राज्यात ऐतिहासिक काम करता आले. यापुढे अधिक उत्साहाने आणि वाढलेल्या जबाबदारीच्या भावनेसह जोमाने काम करण्याची उमेद या निर्विवाद विजयाने दिली आहे. हा आशीर्वाद शिरोधार्य मानून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर दुप्पट वेगाने नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. शरीरातला प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण लाडक्या महाराष्ट्रासाठी वाहून घेणार, हे वचन!’ (हेही वाचा: Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या विधासभेत 'विरोधी पक्षनेता' नसणार? महाराष्ट्रावर नामुष्की)

दुसरीकडे, ट्रेंडमध्ये एनडीए आघाडीचा बंपर विजय पाहून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आधुनिक अभिमन्यू आहे, मी विरोधकांचे चक्रव्यूह मोडून काढले आहे. हा महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा विजय आहे. हा विजय आपल्या एकजुटीचा विजय आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपा-महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भव्य विजय मिळवून दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांचे खूप-खूप आभार आणि अभिनंदन!’



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif