Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महायुती सरकार स्थापन करण्याच्या तयारीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष (Watch Video)

त्याचा जल्लोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुरू आहे. ढोल-ताशाच्या गजरात समर्थक आनंद व्यक्त करत आहेत.

Photo Credit- X

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) निकाल समोर येत आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी विजयी गुलाल उधळला आहे. त्यामुळे आता भाजप पक्ष मोठा भाऊ ठरला असून त्याचा जल्लोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुरू आहे. ढोल-ताशाच्या गजरात समर्थक आनंद व्यक्त करत आहेत. महायुतीने मोठी आघाडी घेतली असून महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. (हेही वाचा: Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही'; एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान मोठा दावा (Watch Video))

त्यामुळे आता भाजप हा विजयाकडे आगेकूच करत आहे. सध्याच्या कलांनुसार महाविकास आघाडीकडे ही मोठ्या फरकाने मागे आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करणार असल्याची चिन्हे आहेत. भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गटाची शिवसेना ही 53 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 34 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर आता महाविकास आघाडीची पिछाडी झाली असल्याचे सध्या तरी चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाची केवळ 21 तर कॉंग्रेसची फक्त 19 जागांवर आघाडी आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तर 14 जागांवर आघाडी मिळवली आहे. (हेही वाचा:Nagpur South West Assembly Constituency 2024: नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी )

यामुळे राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडे सर्वांत जास्त बहुमत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल 12 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.