Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या विधासभेत 'विरोधी पक्षनेता' नसणार? महाराष्ट्रावर नामुष्की

परंतू सध्याचे आकडे पाहता महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठणे कठीण जाणार असल्याचे चित्र आहे.

MVA Leaders | Photo Credits: X @Sharad Pawar

Maharashtra Assembly Election Results 2024:  राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 227 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 54 जागांवर पुढे आहे.  महाराष्ट्र विधानसभा नवडणूक निकाल (Assembly Election Results 2024) अनेकांसाठी धक्कादायक आहेत. काही प्रमाणात ते सत्ताधारी आणि बऱ्याच प्रमाणात विरोधकांसाठीही. राज्यात महायुती म्हणजेच भाजप (BJP), शिवसेना (शिंदे), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले . (हेही वाचा  -  Reasons of Victory of The Maha Yuti: महायुतीच्या विजयाची कारणे कोणती? उदासीन मतदार, भ्रामक प्रचार? )

पाहा पोस्ट -

राज्यात महायुतीने आपली ताकद दाखवली असून महाविकास आघाडीचे पानीपत पहायला मिळत आहे. सध्याच्या कलांनुसार 127 धावांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असून शिवसेना शिंदे गटाने 57 जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीमधील पक्षांने सध्याच्या कलांनुसार 58 धावांवर आघाडी मिळवली आहे. यामध्ये काँग्रेस 23, शिवसेना ठाकरे गट 18 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने 17 जागांवर आघाडी मिळवली आहे.

महाविकास आघाडीच्या या खराब कामगिरीमुळे सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणेही कठीण झाले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला 29 जागा निवडून येणे आवश्यक असते. परंतू सध्याचे आकडे पाहता महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठणे कठीण जाणार असल्याचे चित्र आहे.