Shevgaon-Pathardi Vidhan Sabha Election 2024 Result: भाजप आमदार मोनिका राजळे यांना धक्का! शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले 4720 मतांनी आघाडीवर
शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये यावेळी चौरंगी लढत होत असताना बंडखोर हर्षदा काकडे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले त्याचप्रमाणे भाजपा कडून मोनिका राजळे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे असे उमेदवार निवडणूक रिंगणात होते
Shevgaon-Pathardi Vidhan Sabha Election 2024 Result: शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमधून (Shevgaon Pathardi Constituency) विद्यमान भाजपाच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांच्यामध्ये मुख्य लढत असताना अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये यावेळी चौरंगी लढत होत असताना बंडखोर हर्षदा काकडे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले त्याचप्रमाणे भाजपा कडून मोनिका राजळे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे असे उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
मराठवाड्यालगत असलेल्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघामध्ये भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवशी मोनिका राजळे यांच्यावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. तथापी, प्रतापराव ढाकणे हे माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव असून ते यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाची मशाल हाती घेतून निवडणूक रिंगणात उतरले होते. (हेही वाचा -Paithan Vidhan Sabha Election 2024 Result: पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट उमेदवार विलास भुमरे 14 हजार मतांनी आघाडीवर)
चंद्रशेखर घुले यांचा शेवगाव तालुक्यात चांगला मतदार असून पाथर्डी मध्ये त्यांना मानणारा मतदार कमी आहे. सध्या शेवगाव तालुक्यातील अनेक बूथवर मतमोजणी सुरू असल्याकारणाने ते 4720 मतांनी आघाडीवर आहेत. (हेही वाचा -Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Result: चौथ्या फेरीअखेर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर; राम शिंदे आघाडीवर)
मोनिका राजळे या स्वर्गीय राजीव राजळे यांच्या पत्नी असून गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्या विजयी झाल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून आता त्या चौथ्या फेरी अखेर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.