Maharashtra Assembly Election Results 2024: एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस; कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
स्ट्राईक रेटच्या बाबतीतही भाजपच सर्वात पुढे आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 227 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 54 जागांवर पुढे आहे. महाराष्ट्र विधानसभा नवडणूक निकाल (Assembly Election Results 2024) अनेकांसाठी धक्कादायक आहेत. परंतू या निकालानंतर आता राज्याची घोडदौड कोणत्या नेत्याच्या हाती येणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दोनच नेते आघाडीवर असून त्यातले पहिले नाव हे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर दुसरे नाव हे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव आघाडीवर आहे. (हेही वाचा - Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या विधासभेत 'विरोधी पक्षनेता' नसणार? महाराष्ट्रावर नामुष्की)
राज्यात सध्या भाजपहा 133 जागांवर आघाडी घेवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर शिवसेना शिंदे गटाने 56 जागांवर आघाडी घेत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. स्ट्राईक रेटच्या बाबतीतही भाजपच सर्वात पुढे आहे. यामुळे आता जागांच्या जोरावर भाजपाचा मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रात बिहार मॉडेल वापरले जाणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूका पार पडल्या त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केले जाार की भाजप देवेंद्र फडणवीस यांना संधी देणार हे पहावे लागणार आहे.
दरम्यान सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुतीची बैठक ही आता वर्षा बंगल्यावर सुरु झाली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले असून पवारांसोबत प्रफुल्ल पटेल उपस्थित आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हीआता बैठक ही सुरु झाली असल्याची माहिती मिळाली आहे.