Sarita Fadnavis Reaction to Devendra Fadnavis Victory: 'माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार'; महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांची प्रतिक्रिया
महायुतीच्या या विजयावर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Sarita Fadnavis Reaction to Devendra Fadnavis Victory: महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या मतमोजणीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. महायुती (Mahayuti) बहुमताच्या खूप पुढे गेली असून आता राज्यात पुढचे सरकारही महायुतीचेच स्थापन होणार आहे. महायुतीच्या या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आई सरिता फडणवीस (Sarita Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महायुतीच्या या विजयावर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या सरिता फडणवीस ?
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होताच उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले असून आशीर्वादही दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, 'हा मोठा दिवस आहे. कारण माझा मुलगा राज्यात मोठा नेता झाला आहे. तो 24 तास अथक परिश्रम करतो. अर्थातच तो मुख्यमंत्री होणार आहे. त्याला महाराष्ट्रातील प्रिय बहिणींनी आशीर्वाद दिला आहे.' (हेही वाचा - Maharashtra Assembly Election Results 2024: एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस; कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?)
मुख्यमंत्री महायुतीचाचं असेल - राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया
भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा चमत्कार महाराष्ट्रातील जनतेने घडवून आणला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत बोलताना नार्वेकर यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री महायुतीचाचं असेल. नाव तुम्हाला लवकरच कळेल. (हेही वाचा - Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात कोण जिंकले? कोण आघाडीवर? घ्या जाणून)
माझ्या आकलनानुसार देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेते आहेत. संजय राऊत यांच्याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, संजय राऊत यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजेही बंद होणार आहेत. आपला दारुण पराभव लपवण्यासाठी त्यांना निमित्त शोधावे लागेल. निवडणूक हरल्यावर त्यांची वृत्ती वेगळी असते.