ठळक बातम्या

Delhi Pollution Crisis: दिल्लीचा श्वास कोंडलेलाच! AQI 'गंभीर श्रेणी' मध्ये, शाळांना सुट्टी, वर्ग ऑनलाईन सुरु

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एक्यूआयने 'गंभीर श्रेणी' मध्ये प्रवेश केल्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. नोएडातील शाळांमध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय 25 नोव्हेंबर रोजी घेणार जीआरएपी-4 निर्बंधांचा आढावा.

Fire During Victory Rally of Shivaji Patil: कोल्हापुरात अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजय रॅलीत जेसीबीमधून गुलाल उधळल्यानंतर उडाला आगीचा भडका (Watch Video)

Bhakti Aghav

कोल्हापुरातील महागाव येथील चंदगड मतदारसंघातून नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्या विजयी रॅलीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीमधून गुलाल टाकल्यानंतर आगीने भडका घेतला. या आगीत पाटील यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

India vs Australia 1st Test 2024 Day 3 Live Score Update: भारताने पहिली विकेट गमावली, केएल राहुल मिचेल स्टार्कचा बळी ठरला

Nitin Kurhe

दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. दरम्यान, दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का लागला आहे. केएल राहुल 77 धावा करुन बाद झाला आहे.

Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जैस्वालने पर्थ कसोटीत झळकावले शतक, राहुलसोबत केली सर्वात मोठी भागीदारी

Nitin Kurhe

भारताचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने षटकार मारुन आपल्या शतक पूर्ण केले. दुसऱ्या डावात भारताचा स्कोर 198/0

Advertisement

IND vs AUS 1st Test Day 3 Live Straming: पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवसला सुरूवात, मैदानावर यशस्वी जैस्वाल-केएल राहुल; भारताने घेतली 224 धावांची आघाडी

Nitin Kurhe

IND vs AUS: दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या होत्या. जैस्वाल 90 आणि राहुल 62 धावा करून क्रीजवर आहेत. भारताकडे आता एकूण 224 धावांची आघाडी आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Party Wise Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत BJP ठरला 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष; जाणून घ्या पक्षनिहाय जागा

Prashant Joshi

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असला तरी, या आघाडीतील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मतांच्या संख्येतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षापेक्षा मागे आहेत.

Maharashtra Election Result 2024 Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांची यादी

Prashant Joshi

यंदा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक 65.2% मतदान झाले.

Congress on Maharashtra Election Results: 'आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश स्वीकारतो, जनतेसाठी काम करत राहू'- कॉंग्रेस

Prashant Joshi

महाराष्ट्र निवडणूक निकालांवर राहुल गांधी म्हणाले की, हे अनपेक्षित आहेत. आम्ही त्याचे तपशीलवार विश्लेषण करू. राज्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.

Advertisement

Maharashtra Assembly Election Results: पृथ्वीराज चव्हाण ते झीशान सिद्दीकी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'या' मोठ्या नेत्यांचा पराभव, पहा यादी

Prashant Joshi

महायुतीची भक्कम बहुमताकडे वाटचाल सुरू असताना या निवडणुकीत अनेक मोठे चेहरे प्रतिस्पर्ध्यांकडून पराभूत झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र त्यांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे.

Uddhav Thackeray On Mahayuti Victory: 'आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय'; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया (Video)

Prashant Joshi

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (यूबीटी) पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, 'आज विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांचे आभार. माझा महाराष्ट्र असे करेल, असे वाटत नाही. काहीतरी चूक आहे.'

Devendra Fadnavis On Real Shiv Sena: लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे; महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Bhakti Aghav

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने आपला जनादेश दिला असून लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे. तसेच अजित पवारांना (Ajit Pawar) राष्ट्रवादीची वैधता मिळाली आहे.'

Maharashtra Assembly Election Results 2024: कराड (दक्षिण) मध्ये कॉंग्रेसला मोठा झटका; महाराष्ट्राचे माजी Prithviraj Chavan यांचा पराभव

Prashant Joshi

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून 39,355 मतांनी पराभव झाला आहे.

Advertisement

Maharashtra New Chief Minister: 'महाराष्ट्राला 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन मुख्यमंत्री मिळणार', महायुतीच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Prashant Joshi

निवडणूक आयोगाने अधिकृतपणे अंतिम निकाल जाहीर केला नसला तरी, भाजप-महायुती नवीन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी भाजपला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल असा दावा करणारे अनेक अहवाल समोर आले आहेत.

Aurangabad East Election Result 2024: औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात फुललं कमळ; भाजपचे अतुल सावे विजयी; इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव

Bhakti Aghav

मतमोजणीच्या अंतिम फेरीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मंत्री अतुल सावे यांनी 2161 मतांनी बाजी मारून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या इम्तियाज जलील यांचा पराभव केला. पहिल्या फेरीपासून ते विसाव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या फेरीत अतुल सावेंनी विजयश्री खेचून आणला.

PM Narendra Modi Hails Mahayuti's Maharashtra Victory: 'हा विकासाचा, सुशासनाचा विजय आहे'; महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयावर पीएम नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

Prashant Joshi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दणदणीत विजयाचे कौतुक केले.

Mahim Vidhan Sabha Result 2024: 'जनतेचा कौल मला मान्य'; माहीम विधानसभेतील पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Bhakti Aghav

मनसे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघात मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. माहिम मतदारसंघात रंगलेल्या तिरंगी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. पराभवानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election Results 2024: राज ठाकरेच्या मनसेला जनतेने पुन्हा नाकारले; राज्यात एकही जागी विजय नाही

Amol More

अमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: 56 लाख फॉलोअर्स असलेल्या एजाज खानचा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव; वर्सोवा मतदारसंघातून फक्त 146 मते

Jyoti Kadam

अभिनेता एजाज खान महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये नशीब आजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र त्याला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. वर्सोवा मतदारसंघातून उभा राहिलेल्या एजाज खानला निवडणूकीत फक्त 146 मते मिळाली.

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात 'लाडकी बहिण योजना' ठरली महायुतीसाठी गेमचेंजर; विधानसभा निवडणुकीच्या यशात मोठा वाटा

Prashant Joshi

याधीच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे 5% मतदान वाढले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही वाढ महिलांमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचे आकडेदेखील हे सिद्ध करतात.

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मनोज जरंगे फॅक्टर अपयशी; मराठवाड्यात महायुतीला भक्कम पाठिंबा

Bhakti Aghav

महायुतीला 225 जागांचा आकडा ओलांडण्यात यश आलं आहे. मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन महायुतीच्या यशात अडथळा ठरेल, अशी अपेक्षा असतानाही महायुतीने मराठवाड्यात चांगली कामगिरी केली आहे.

Advertisement
Advertisement