India Beat Australia 1st Test 2024 Scorecard: पर्थ कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, कांगारुचा 295 धावांनी केला पराभव; जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर

या सामन्यात टीम इंडियाने कांगारुचा 295 धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.

Team India (photo Credit - X)

Australia National Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने कांगारुचा 295 धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य दिले होते. पण यजमान संघ 58.4 षटकात दहा विकेट गमावून 238 धावा करु शकला. पर्थ कसोटीत रोहितच्या जागी जसप्रीत बुमराहाने कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेतली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती होती. (हे देखील वाचा: Virat Kohli 7th Test Century in Australia: विराट कोहलीचे ऑस्ट्रेलियात सातवे दमदार शतक; सुनिल गावसकरांच्या विक्रमाची केली बरोबरी)

येथे वाचा संपूर्ण स्कोरकार्ड

पहिल्या डावात भारतीय फलंदाज फ्लाॅप

त्याआधी, पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले मात्र त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही. यानंतर देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 5 धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. या वेळी केएल राहुलने एक टोक धरले आणि हळूहळू संघाच्या खात्यात धावांची भर घातली पण तोही 26 धावा करुन बाद झाला.

जोश हेझलवूडने घेतल्या 4 विकेट

त्यानंतर मिचेल मार्शने ध्रुव जुरेल (11) आणि वॉशिंग्टन सुंदर (4) यांना आपला बळी बनवले. 37 धावा करू शकणाऱ्या पॅट कमिन्सने पंतची मौल्यवान विकेट घेतली. यानंतर हर्षित राणा 7 धावा करून बाद झाला तर कर्णधार जसप्रीत बुमराह 8 धावा करून बाद झाला. भारताला शेवटचा धक्का नितीशच्या रूपाने बसला. नितीश 41 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4 विकेट घेतल्या. तसेच, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी 2-2 विकेट घेतल्या.

बुमराहने घेतल्या पाच विकेट

त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या दिवशी 104 धावांवर गारद झाला. त्यामुळे भारताला 46 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने 14 च्या स्कोअरवर मॅकस्वीनीच्या रूपात पहिली विकेट गमावली. बुमराहने 19 धावांवर ख्वाजाला आपला दुसरा बळी बनवला, पुढच्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथही एलबीडब्ल्यू झाला. यानंतर हर्षित राणाने ट्रॅव्हिस हेडला 31 धावांवर बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. मोहम्मद सिराजने मिचेल मार्शला बाद केले. त्यानंतर सिराजने मार्नस लॅबुशेनला बाद करून ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला झेलबाद केले. आणि त्यानंतर कांगारुनी विकेट फेकल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर हर्षित राणाने 3 आणि सिराजने 2 विकेट घेतल्या.

जैस्वाल आणि विराट कोहलीचे शतक

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी 487 धावांवर आपला डाव घोषित केला. आणि आघाडी घेत ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले. कोहली व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वालने भारतासाठी शतक झळकावत 161 धावांची शानदार खेळी खेळली, तर केएल राहुलने 77 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, हेझलवूड, कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. नॅथन लायनला दोन विकेट मिळाल्या.

ऑस्ट्रेलिया 238 धावांवर बाद

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाची वाईट सुरुवात झाली. त्यांनी तिसऱ्या दिवसाच्या खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावून 12 धावा केल्या. भारताकडून बुमराहला दोन आणि सिराज 1 विकेट मिळाली. त्यानंतर आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज काही खास करु शकले नाही. भारतीय गोलंदाजांनी प्राणघातक हल्ला करत ख्वाजा आणि स्मिथला स्वस्तात तंबूत पाठवले. त्यानंतर भारतासाठी नेहमी डोकेदुखी ठरणारा ट्रेविस हेड कांगारुसाठी किल्ला लढत राहिला. त्याला मिचेल मार्शच्या रुपाने साथ मिळाली. हेड 101 चेंडूत 8 चौकार मारत 89 धावा करुन जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. त्यानंतर 47 धावांवर मिचेल मार्श नितेश रेड्डीचा बळी ठरला. त्यानंतर भारतीय गोलंदांजानी पुढच्या फलंदाजांना जास्त वेळ टिकू दिले नाही आणि त्यांना 238 धावांवर बाद केले.

जसप्रीत बुमराह आणि सिराजचा घातक मारा

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि सिराजने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर हर्षित राणाल आणि नितेश रेड्डीला 1-1 विकेट मिळाली. तर सुंदरने 2 विकेट घेतल्या. आता पुढील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

Tags

AUS vs IND Australia Men's cricket team Australia vs India BCCI Board of Control for Cricket in India Border-Gavaskar trophy Border-Gavaskar Trophy 2024-25 India squad For Australia Tour India national cricket team Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team Jasprit Bumrah KL Rahul Perth Perth Stadium Rohit Sharma Sydney Sydney Cricket Ground Team India Team India vs Australia Test Series Virat Kohli WTC Final India National Cricket Team Vs Australia Men's cricket team match Scorecard ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ केएल राहुल जसप्रीत बुमराह टीम इंडिया टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका डब्ल्यूटीसी फायनल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ रवींद्र जडेजा रोहित शर्मा विराट कोहली भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड India Beat Australia 1st Test Scorecard