Coast Guard Seizes Drugs in Andaman: भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप जप्त, 5 टन ड्रग्ज अंदमानमध्ये सापडले

ज्यामध्ये समुद्रात तस्करी केली जाणारी ड्रग्ज जप्त केली जात आहे.

Photo Credit- X

Coast Guard Seizes Drugs in Andaman: भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard)अंदमान समुद्रात (Andaman) सुमारे पाच टन अमली पदार्थांची मोठी खेप जप्त केली आहे. ही खेप मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीतून करण्यात आणली जात होती. संरक्षण अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतची सर्वात मोठी खेप असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी ही कारवाई केली.

या कारवाईची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. अंमली पदार्थांची तस्करी आणि कार्टेलवर कारवाई करताना अंमली पदार्थ विरोधी एजन्सींनी सर्व बाबी जप्त केल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला जवळपास 700 किलोग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते. या कारवाईत आठ इराणी नागरिकांना अटक करण्यात आली होती.(Fake Weight-Loss Drugs: बनावट वजन कमी करणारी औषधे विकणाऱ्या 250 वेबसाइट बंद; सायबर सिक्युरिटी फर्म BrandShield ची मोठी कारवाई)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने एका निवेदनात म्हटले की, या कारवाईल 'सागर मंथन - 4' असे नाव देण्यात आले होते. ही कारवाई गुप्तचर माहितीच्या आधारे सुरू करण्यात आली होती. ही कारवाई एनसीबी, नौदल आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तपणे केली.

यावर्षी सागरी मार्गाने 3,500 किलो ड्रग्जची तस्करी अंमली पदार्थ विरोधी एजन्सींनी जप्त केली. तीन कारवाईंमध्ये 11 इराणी आणि 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार हे सर्व परदेशी सध्या तुरुंगात असून न्यायालयाच्या सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत.