ATM Theft Video: चोरी करण्यासाठी चोराने फोडले एटीएम, घटना सीसीटीव्हीत कैद

एक चोर कुऱ्हाडी घेऊन एटीएमपर्यंत पोहोचला होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही चोरी करता न आल्याने त्याने कुऱ्हाडीने एटीएमची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोपका तलावाजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली.

Credit -Pixabay

ATM Theft Video: छत्तीसगडमधील बिलासपूर येथून चोरीची घटना समोर आली आहे. एक चोर कुऱ्हाडी घेऊन एटीएमपर्यंत पोहोचला होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही चोरी करता न आल्याने त्याने कुऱ्हाडीने एटीएमची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोपका तलावाजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'एक मुखवटा घातलेला माणूस एटीएममध्ये घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करतो, पण तो यशस्वी न झाल्याने तो कुऱ्हाडीने एटीएम फोडतो.

येथे पाहा, व्हिडीओ: 

एटीएम चोरीचा प्रयत्न

सकाळी हा प्रकार सफाई कामगाराने पाहिल्यानंतर त्यांनी कंपनीला माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.