ठळक बातम्या
IND vs AUS 2nd Test 2024 Pitch Report: वेगवान गोलंदाज की फिरकीपटू, ॲडलेडमध्ये कोण गाजवणार वर्चस्व? गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी कशी असणार खेळपट्टी? येथे घ्या जाणून
Nitin Kurheभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुलाबी चेंडू कसोटीसाठी (IND Vs AUS) दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. या सामन्यात खेळपट्टीची भूमिका अतिशय खास असणार आहे. फिरकीपटूंना मदत मिळेल की वेगवान गोलंदाज वरचढ राहणार की फलंदाजांना संस्मरणीय खेळी खेळण्याची संधी आहे?
IND vs AUS 2nd Test 2024 Weather Report: ॲडलेड कसोटी सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? कसे असणार पाच दिवसाचे हवामान? एका क्लिकवर घ्या जाणून
Nitin Kurheभारताने आतापर्यंत 1 सामना जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसरा सामनाही जिंकण्याचा निर्धार करेल, तर यजमान ऑस्ट्रेलियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो.
Jammu Kashmir Road Accident: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये वाहन दरीत कोसळल्याने चार ठार; 14 जखमी
Bhakti Aghavया अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर 14 जण जखमी झाले. आपत्कालीन सेवांनी जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. अधिकारी अपघाताच्या कारणाचा शोध घेत आहेत. तसेच जखमींना आवश्यक मदत करण्यात येत आहे.
Chikungunya Cases Increase in Maharashtra: महाराष्ट्रात चिकुनगुनिया प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ; खालावलेली आरोग्यसेवा आणि आर्थिक घटक कारणीभूत?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Health News: महाराष्ट्रात 2024 मध्ये 5000 हून अधिक संसर्गांसह चिकनगुनियाच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ नोंदवली गेली आहे. या आजारामुळे आरोग्य आणि आर्थिक ओझे वाढत असल्याचा इशारा तज्ज्ञ देतात.
IND vs AUS 2nd Test 2024: भारताविरुद्ध पिंक बॉल कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 घोषित, हेझलवूडच्या जागी 'या' वेगवान गोलंदाजाला संधी
Nitin Kurheगुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा यजमान संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत, ज्यांना या मालिकेतील पहिल्या सामन्यात 295 धावांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
Delhi Metro's Blue Line Services Disrupted: केबल चोरीला गेल्याने मोती नगर ते कीर्ती नगर दरम्यान दिल्ली मेट्रोची ब्लू लाईन सेवा विस्कळीत
Bhakti Aghavमोती नगर आणि कीर्ती नगर स्थानकांदरम्यान केबल चोरीला गेल्याने बुधवारी दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाइनवरील सेवा विस्कळीत झाली. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
Girls Private Parts Injured: अंथरूण ओले केल्याबद्दल शिक्षा, मुलीच्या गुप्तांगांवर जखमा; सरकारी बालगृहात धक्कादायक प्रकार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअडीच वर्षांच्या मुलीने अंथरुन ओले केले याबद्दल बालगृहात कर्तव्यवावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिस अमानुषमारहाण केली. तिच्यासोबत गैरवर्तन केले. ज्यामुळे तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्या. केरळ पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Weather Update: मुंबईकरांनी 4 डिसेंबरला अनुभवला 16 वर्षांतील डिसेंबरमधील सर्वात उष्ण दिवस; 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Bhakti Aghavभारतीय हवामान विभाग (IMD) नुसार कुलाबा हवामान केंद्राने कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा किंचित कमी नोंदवले. यापूर्वी डिसेंबरमध्ये मुंबईत इतके उच्च तापमान 5 डिसेंबर 2008 रोजी नोंदवले गेले होते. त्यावेळी मुंबईत 37.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
South Africa vs Sri Lanka 2nd Test 2024 Live Streaming: आज दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार दुसरा कसोटी सामना, भारतात कधी, कुठे आणि कसा घेणार थेट सामन्याचा आनंद घ्या जाणून
Nitin Kurheउभय संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेला 516 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 79.4 षटकांत 282 धावांवर गारद झाला. यासह यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
AUS W vs IND W 1st ODI 2024 Toss Update: पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11
Nitin Kurheहरमनप्रीत ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियातील विक्रम सुधारण्यावर लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने आतापर्यंत 16 पैकी फक्त चार एकदिवसीय सामने जिंकले आहेत. भारताला 2021 मध्ये शेवटच्या वेळी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
AUS W vs IND W 1st ODI 2024 Live Streaming: थोड्याच वेळात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवला जाणार पहिला वनडे सामना, कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?
Nitin Kurheउभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर मैदानावर होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 50 षटकांच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सिलसिला तोडण्याचे लक्ष्य ठेवत आहे, ज्याने त्यांना 2021 मध्ये अखेरचा पराभव केला होता.
Maharashtra CM Oath Taking Ceremony: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबई येथील आझाद मैदानावर सोहळा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदेवेंद्र फडणवीस आज आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? याबाबत उत्सुकता आहे.
Zimbabwe vs Pakistan 3rd T20 2024 Live Streaming: आज झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार तिसरा टी-20 सामना, भारतात कधी, कुठे घेणार सामन्याचा आनंद घ्या जाणून
Nitin Kurheतीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संघ 12.4 षटकांत 57 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाने 5.3 षटकांत लक्ष्य गाठले.
Stampede During Premiere Pushpa 2: पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू
Bhakti Aghavचित्रपटाचा प्रीमियर मध्यरात्री हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्वतः हैदराबादच्या आरटीसी क्रॉस रोड येथील संध्या थिएटरमध्ये पोहोचले. अनियंत्रित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले.
‘Should I Call Bishnoi?’: सलमान खानच्या शूटिंगच्या ठिकाणी एका व्यक्तीचा बेकायदेशीरपणे घुसकोरी करण्याचा प्रयत्न; दिली लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी
Prashant Joshiयाआधीही सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेत्याच्या वांद्रे येथील घराबाहेर संशयित टोळी सदस्यांनी गोळीबार केला होता.
Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Wedding Photos: अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला विवाहबंधनात अडकले; Nagarjuna ने शेअर केले लग्नाचे खास फोटोज
Prashant Joshiशोभिताने लग्नात सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तर नागा चैतन्य पांढऱ्या आणि नारंगी रंगाच्या धोती कुर्ता परिधान केला आहे.
Mahaparinirvan Diwas 2024 Messages: महापरिनिर्वाण दिनी WhatsApp Stickers, Shayari, GIF Images, Wallpapers च्या माध्यमातून पाठवा खास संदेश
Shreya Varkeभारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले होते. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात मदत केली आणि ते देशाचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री बनले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या सुमारे 5 लाख अनुयायांचे बौद्ध धर्मात रूपांतर केले.
Mamta Kulkarni in Mumbai After 25 Years: ममता कुलकर्णी 25 वर्षांनी मुंबईत परतली; मातृभूमी पाहून अश्रू अनावर (Video)
Prashant Joshiतिने नमूद केले की, जेव्हा फ्लाइट लँड होणार होती तेव्हा ती भावूक झाली होती, कारण तिने 25 वर्षात पहिल्यांदा तिचा देश वरून पाहिला होता. आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना तिला अश्रू अनावर झाले.
MP Shocker: सागर जिल्ह्यात 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने शाळेत दिला बाळाला जन्म; दुसऱ्या दिवशी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह, काकाला अटक, तपास सुरु
Prashant Joshiमाहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी 16 वर्षाच्या 11वीच्या विद्यार्थिनीने शाळेत बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने त्याची तपासणी केली होती. त्या दिवशी मूल पूर्णपणे निरोगी होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला बाळाचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला.
Satta Matka Mumbai Online Results: ऑनलाईन सट्टा मटका रिझल्ट चार्ट पाहण्यापूर्वी पहा तुम्ही फ्रॉड वेबसाईट च्या जाळ्यात तर अडकत नाही ना?
Dipali Nevarekarदिसावर नाईट सट्टा किंग हा खेळ रोमांचक असला तरीही यामध्ये जोखिम आहे. हा खेळ आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहे पण त्यासोबतच सामाजिक आणि कायदेशीर पद्धतीने देखील तुम्हांला गोत्यात आणू शकतो.