Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Wedding Photos: अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला विवाहबंधनात अडकले; Nagarjuna ने शेअर केले लग्नाचे खास फोटोज

शोभिताने लग्नात सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तर नागा चैतन्य पांढऱ्या आणि नारंगी रंगाच्या धोती कुर्ता परिधान केला आहे.

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala (Photo Credits: Instagram)

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Wedding Photos: अभिनेत्री नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांनी त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू केला आहे. आज 4 डिसेंबर रोजी त्यांनी पारंपारिक तेलुगू विधींसह लग्नगाठ बांधली. नागार्जुनने या लग्नाचे तसेच वर-वधूचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शोभिताने लग्नात सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तर नागा चैतन्य पांढऱ्या आणि नारंगी रंगाच्या धोती कुर्ता परिधान केला आहे. रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला तिरुपती मंदिर किंवा श्रीशैलम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेणार आहेत. या लग्नासाठी नागार्जुन आणि कुटुंबीयांनी तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या स्टार्सना आमंत्रित केले आहे. यामध्ये चिरंजीवी, अल्लू अर्जुन, पीव्ही सिंधू, नयनथारा, अक्किनेनी आणि दग्गुबती कुटुंब, एनटीआर, राम चरण, आणि उपासना कोनिडेला, महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Pushpa 2 BTS Viral Video: पुष्पा 2 रिलीज होण्यापूर्वी, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का, निर्मात्यांनी चित्रपटाचा BTS व्हिडिओ केला शेअर)

नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला विवाहबंधनात अडकले-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement