Mamta Kulkarni in Mumbai After 25 Years: ममता कुलकर्णी 25 वर्षांनी मुंबईत परतली; मातृभूमी पाहून अश्रू अनावर (Video)

तिने नमूद केले की, जेव्हा फ्लाइट लँड होणार होती तेव्हा ती भावूक झाली होती, कारण तिने 25 वर्षात पहिल्यांदा तिचा देश वरून पाहिला होता. आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना तिला अश्रू अनावर झाले.

Mamta Kulkarni (Photo Credits: Instagram)

शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर चित्रपट 'करण अर्जुन'ची अभिनेत्री ममता कुलकर्णी अनेक वर्षांपासून अज्ञात होती. तिच्याबद्दल, तसेच ती कुठे आहे याबद्दल काहीच माहिती नव्हती. अखेर 25 वर्षांनंतर ती मुंबईमध्ये परतली आहे. खुद्द ममताने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. ममता कुलकर्णीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने 25 वर्षांनी मुंबईमध्ये परतल्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ममता कुलकर्णीने 2000 मध्ये देश सोडला होता. व्हिडिओमध्ये ती सांगते, मी ममता कुलकर्णी. मी 25 वर्षांनी मुंबईमध्ये आले आहे.’ तिने नमूद केले की, जेव्हा फ्लाइट लँड होणार होती तेव्हा ती भावूक झाली होती, कारण तिने 25 वर्षात पहिल्यांदा तिचा देश वरून पाहिला होता. आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना तिला अश्रू अनावर झाले. अहवालानुसार ती 2012 मध्ये महाकुंभसाठी भारतात आली होती आणि आता ती 12 वर्षांनी दुसऱ्या महाकुंभ 2025 साठी परत आली आहे. (हेही वाचा: Vikrant Massey Not Retiring: 'लोकांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला'; चित्रपटातून निवृत्तीच्या चर्चांवर विक्रांत मॅसीचे स्पष्टीकरण)

Mamta Kulkarni in Mumbai After 25 Years:-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mamta Kulkarni 🔵 (@mamtakulkarniofficial____)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now