AUS W vs IND W 1st ODI 2024 Toss Update: पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11
हरमनप्रीत ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियातील विक्रम सुधारण्यावर लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने आतापर्यंत 16 पैकी फक्त चार एकदिवसीय सामने जिंकले आहेत. भारताला 2021 मध्ये शेवटच्या वेळी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
Australia Women's National Cricket Team vs Indian Women's National Cricket Team: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आजपासून ही मालिका सुरू झाली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना ॲलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. हरमनप्रीत ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियातील विक्रम सुधारण्यावर लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने आतापर्यंत 16 पैकी फक्त चार एकदिवसीय सामने जिंकले आहेत. भारताला 2021 मध्ये शेवटच्या वेळी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाची कमान अष्टपैलू ताहलिया मॅकग्राकडे आहे. नियमित कर्णधार ॲलिसा हिली गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, तीतास साधू, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मुनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट