ठळक बातम्या
Mumbai: विक्रोळी येथे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरवरून मशिन पडल्याने दुचाकीस्वार जखमी; ड्रायव्हरला अटक (Watch Video)
Jyoti Kadamविक्रोळी येथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पहाटे 4.30 वाजता भीषण अपघातात झाला. पोलिसांनी ट्रेलर चालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
NZ vs ENG 3rd Test 2024 Day 1 Stump: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडची दमदार सुरुवात, 9 विकेट गमावून केल्या 315 धावा; येथे पहा स्कोअरकार्ड
Nitin KurheNZ vs ENG 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर (शनिवार) पासून सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडने आधीच 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंड आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंडचे लक्ष्य क्लीन स्वीपचे असेल.
BSNL Launch 5G Mid-Next Year: बीएसएनएल पुनरागमन करण्याच्या तयारीत? पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत करणार 5G लाँच
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBsnl Financial Growth: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या आर्थिक पुनरागमन करत आहे आणि 2024 च्या मध्यापर्यंत 5 जी सुरू करणार असल्याचे म्हटले. भारताच्या दूरसंचार पुनरुज्जीवन आणि स्वदेशी 4G उपाययोजनांविषयी अधिक जाणून घ्या.
Viral Video: अप्रतिम इंग्रजी बोलणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी चकित
Shreya Varkeजगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. बरेच लोक काही प्रजातीचे पक्षी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 1 Stump: ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे गेला वाहून, फक्त 13.2 षटके खेळली गेली; येथे पाहा स्कोरकार्ड
Nitin Kurheदिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने 19 धावा केल्या असून नॅथन मॅकस्वीनी 4 धावा केल्यानंतर त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना एकही बळी घेता आला नाही.
CIDCO Recruitment: सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती, 11 जानेवारी 2025 अर्जाची शेवटची तारीख
Jyoti Kadamसरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. चांगला पगार, सरकारी नोकरी मिळणार आहे. याबाबत सिडको महामंडळाद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Lal Krishna Advani Hospitalized: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; अपोलो रुग्णालयात दाखल
Bhakti Aghavअडवाणी डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले आहे. न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ विनित सुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना दाखल करण्यात आले आहे.
Year Ender 2024: क्रीडाविश्वासाठी 'हे' वर्ष ठरले अभूतपूर्व, टी-20 विश्वचषकापासून ते बुद्धिबळापर्यंत जगावर भारताने कोरलं आपल नाव
Nitin Kurheखेळांमध्ये भारताने 2024 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे संपूर्ण देशवासीयांना अभिमान वाटला. 2024 हे वर्ष काही दिवसात संपणार आहे, त्यामुळे नवीन वर्षाच्या आधी 2024 मध्ये भारताने क्रीडा जगतात कोणती कामगिरी केली आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Delhi schools Bomb Threat: दिल्लीती अनेक शाळांना बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेडीपीएस आरके पुरम आणि रायन इंटरनॅशनलसह दिल्लीतील अनेक शाळांना शनिवारी बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले. पोलिस तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु सुरक्षिततेबद्दल चिंता कायम आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Sunanda Pawar: 'मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद वाढते'; शरद पवार-अजित पवार एकत्र येण्यावर सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य
Jyoti Kadamशरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. रोहित पवार यांच्या आईनी यावर मोठं भाष्य केलं आहे.
Water Cut in Mumbai City, Suburbs, Thane and Bhiwandi: 2 दिवस मुंबई शहर, उपनगरासह ठाणे आणि भिवंडीमध्ये 15 टक्के कपात; पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड
Jyoti Kadamपिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिघाड झाला. परिणामी दुरुस्तीचे काम 2 दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाणे सुरू राहील.
Virat Kohli New Record: विराट कोहलीचा भीम पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू; जाणून घ्या पाहिल्या स्थानी कोण
Nitin Kurheभारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजा आणि आकाश दीप तिथे दाखल झाले आहेत. दुसरीकडे, सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) मैदानात उतरताच अनोखे शतक झळकावले आहे.
Viral Video: गजरा विकणाऱ्या गरीब मुलाला अज्ञात व्यक्तीने दिले सरप्राईज, आनंदाने निरागस मुलाच्या चेहऱ्यावर उमटले हसू
Shreya Varkeकाही लोकांना मोठ्या गोष्टी मिळाल्यावरही आनंद मिळत नाही तर अनेकांना छोट्या गोष्टीत मोठा आनंद मिळतो. अनेकवेळा असे सरप्राईज मिळते ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. दरम्यान, एका लहान मुलाचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला गजरा विकणाऱ्या मुलाला सुंदर सरप्राईज दिले आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून लोक भावूक होत आहेत आणि त्याला खूप पसंती दिली जात आहे.
Mumbai Local Train Update: विजपुरवठा खंडीत, तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई लोकल 30 मिनीटे उशिरा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Central Railway News: कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान वीज बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या सेंट्रल लाइनवरील लोकल ट्रेन सेवा 14 डिसेंबर रोजी विस्कळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांना 30-40 मिनिटे उशीर झाला.
AFG vs ZIM 2nd T20I Match 2024 Scorecard: अफगाणिस्तानने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 50 धावांनी केला पराभव, रशीद खानने केली घातक गोलंदाजी; मालिका 1-1 अशी बरोबरीत
Nitin Kurheदुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 50 धावांनी पराभव केला. यासह अफगाणिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान करत आहे.
आजचा हवामान अंदाज: तापमान वाढले तरी, राज्यात गारठा राहणार; जाणून घ्या IMD Weather Forecast
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकधी गरम कधी थंड अशी काहीशी वातावरणाची विचित्र स्थिती राज्यामध्ये पाहाला मिळत आहे. देशातील सपाट भूभाग असलेल्या प्रदेशामध्ये तापमान प्रचंड खालावले आहे. इतके की, पारा शून्य अंशाच्या खाली घसरल्याच्या नोंदी झाल्या आहेत.
Delhi School Bomb Threat: दिल्ली पोलिसांकडून डीपीएस आरके पुरम आणि इतर शाळांमध्ये तपासणी; ईमेलद्वारे मिळाली होती बॉम्बने उडवण्याची धमकी (Watch Video)
Jyoti Kadamकाही दिवसांपूर्वी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. आज 14 डिसेंबर रोजीही पोलिसांनी शाळामध्ये जाऊन तपासणी केली. शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलिस करत आहेत.
SA Beat PAK 2nd T20I 2024 Scorecard: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी, रीझा हेंड्रिक्सने झळकावले शतक
Nitin KurheSA vs PAK: सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. हा सामना धावांच्या पावसाने भरलेला होता, जिथे दोन्ही संघाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.