Delhi School Bomb Threat: दिल्ली पोलिसांकडून डीपीएस आरके पुरम आणि इतर शाळांमध्ये तपासणी; ईमेलद्वारे मिळाली होती बॉम्बने उडवण्याची धमकी (Watch Video)
आज 14 डिसेंबर रोजीही पोलिसांनी शाळामध्ये जाऊन तपासणी केली. शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलिस करत आहेत.
Delhi School Bomb Threat: दिल्ली पोलीस डीपीएस आरके पुरमसह (DPS RK Puram) अनेक शाळांना मिळालेल्या बॉम्बच्या धमक्यांचा (School Bomb Threat) तपास करत आहेत, काही दिवसांपूर्वी धमकीचे ईमेल (Bomb Threat Email) पाठवण्यात आले होते. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कसून तपासणी केली जात आहे. शुक्रवारी दिल्लीतील 30 शाळांना फसव्या बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. अधिकारी सध्या परिस्थितीचा तपास करत आहेत. त्यामुळे महत्त्वाची माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली पोलिसांकडून डीपीएस आरके पुरम आणि इतर शाळांमध्ये तपासणी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)