IND vs AUS 3rd Test 2024 Day 1 Stump: ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे गेला वाहून, फक्त 13.2 षटके खेळली गेली; येथे पाहा स्कोरकार्ड

उस्मान ख्वाजाने 19 धावा केल्या असून नॅथन मॅकस्वीनी 4 धावा केल्यानंतर त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना एकही बळी घेता आला नाही.

The Gabba, Brisbane (Photo Credit - X)

Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी (IND vs AUS 3rd Test 2024) सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन (Brisbane) येथे खेळवला जात आहे. पंरतु पहिल्या दिवशी पाऊस खलनायक ठरला, त्यामुळे केवळ 13.2 षटकेच खेळता आली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने 19 धावा केल्या असून नॅथन मॅकस्वीनी 4 धावा केल्यानंतर त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना एकही बळी घेता आला नाही.

पहिल्या सत्रात पावसाचा व्यत्यय

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवस आणि पहिल्या सत्रात पावसाने व्यत्यय आणला होता. यावेळी सुमारे 10 मिनिटांनी सामना सुरू झाला, मात्र दुसऱ्यांदा पाऊस आल्याने तो थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. ब्रिस्बेनमध्ये मुसळधार पावसामुळे गाबा मैदानात पाणी पाणीच झाले. मैदान ओले असल्याने दुसरे सत्र रद्द करण्यात आले आणि परिस्थिती सुधारत नसताना भारतीय वेळेनुसार रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.

(हे देखील वाचा: Virat Kohli New Record: विराट कोहलीचा भीम पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू; जाणून घ्या पाहिल्या स्थानी कोण)

खेळ दुसऱ्या दिवशी लवकर सुरू होईल

पहिला दिवस पावसाने वाहून गेल्यामुळे, उर्वरित दिवसांचा खेळ लवकर सुरू होईल आणि दररोज 90 ऐवजी 98 षटके खेळली जातील. तिसरा कसोटी पूर्णपणे रद्द झाल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. अनिर्णित राहिल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना प्रत्येकी चार गुण मिळतील. त्या स्थितीत टीम इंडियाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मालिकेतील उर्वरित सर्व कसोटी सामने जिंकाव्या लागतील.

Tags

AUS vs IND Australia Men's cricket team Australia vs India Border-Gavaskar trophy Border-Gavaskar Trophy 2024-25 India national cricket team Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team Jasprit Bumrah KL Rahul The Gabba Brisbane The Gabba Brisbane Rohit Sharma Team India Team India vs Australia Test Series Virat Kohli WTC Final IND vs AUS 3rd Test 2024 ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ केएल राहुल जसप्रीत बुमराह रोहित शर्मा टीम इंडिया टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका डब्ल्यूटीसी फायनल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ रवींद्र जडेजा विराट कोहली गाबा ब्रिस्बेन शुभमन गिल Shubman Gill australian men’s cricket team vs india national cricket team Scorecard भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना