Lal Krishna Advani Hospitalized: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; अपोलो रुग्णालयात दाखल
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले आहे. न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ विनित सुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना दाखल करण्यात आले आहे.
Lal Krishna Advani Hospitalized: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले आहे. न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ विनित सुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना दाखल करण्यात आले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला देखील त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपोलो हॉस्पिटलने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, आम्ही सर्वांना कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. पुढील अपडेट प्रदान केली जातील, असं रुग्णालयाने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे. तथापी, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची पुष्टी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. (हेही वाचा -L K Advani Birthday: PM Narendra Modi यांच्याकडून लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा)
भाजप नेते अडवाणी यांना गेल्या 4-5 महिन्यांत अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना ऑगस्ट महिन्यात रुगालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अडवाणी हे गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. वयाच्या 14 व्या वर्षी अडवाणी RSS चे सदस्य झाले. 1947 मध्ये फाळणीनंतर ते कुटुंबासह भारतात आले. 1951 मध्ये ते श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघात सामील झाले. 1970 मध्ये ते राज्यसभेवर गेले आणि दोन वर्षांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांना माहिती आणि प्रसारण मंत्री करण्यात आले. (Lal Krishna Advani Health Updates: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांचे पथक लक्ष ठेऊन- सूत्र)
भाजपचे तीन वेळा अध्यक्ष -
दरम्यान, 1980 मध्ये त्यांनी भाजपच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागांवरून 1990 च्या दशकात राष्ट्रीय सत्तेत रुपांतरित करण्यासाठी अडवाणी यांची ओळख आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा पुरस्कार करणाऱ्या रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपचे राजकीय भवितव्य मोठ्या प्रमाणात वाढले. अडवाणी यांनी तीन वेळा भाजपचे अध्यक्षपद भूषवले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये त्यांनी उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली.