Mumbai: विक्रोळी येथे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरवरून मशिन पडल्याने दुचाकीस्वार जखमी; ड्रायव्हरला अटक (Watch Video)

पोलिसांनी ट्रेलर चालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Photo Credit- X

Mumbai: विक्रोळी येथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Eastern Express Highway) पहाटे 4.30 वाजता भीषण अपघातात झाला. एका ट्रेलरवर(Trailer) असलेले जड मशीन पडल्याने दुचाकीस्वार जखमी (Biker Injured) झाल्याची माहिती समोर आली आहे. विपुल पांचाळ (44) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कांदिवलीच्या दिशेने जात असताना जवळच असलेल्या ट्रेलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहतूक करणारी जड मशीन पांचाळ यांच्यावर पडली. स्थानिकांनी जखमी दुचाकीस्वाराला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

"अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आणि मोटार वाहन कायद्यानुसार ट्रेलर चालकाला अटक केली आहे," असे विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नायकवडी यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)