ठळक बातम्या

Sunita Williams Christmas 2024 Celebration in Space Video: सुनीता विल्यम्स अंतराळात ख्रिसमस साजरा करण्याच्या तयारीत; नासाकडून व्हिडिओ शेअर (Watch Video)

Jyoti Kadam

सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळात ख्रिसमस साजरा करण्याच्या तयारीत आहेत. नासाकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटीचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध होणार का? येथे जाणून घ्या संपूर्ण तपशील

Amol More

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: चौथी कसोटी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जाईल. याशिवाय, चाहते डिस्ने+ हॉटस्टार ॲपवर या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकतात. दरम्यान, फ्री डिशवर या सामन्याचे प्रसारण संबंधित तपशीलांसाठी खाली स्क्रोल करा.

Bhimtal Bus Accident: उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भीमतालजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु

Shreya Varke

उत्तराखंडमधील भीमतालमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत पडून भीमतालजवळ हा अपघात झाला असून, यात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना दरीत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Anna University Student Raped Inside Campus: चेन्नईतील अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवर कॅम्पसमध्ये बलात्कार, आरोपींविरोध गुन्हा दाखल

Bhakti Aghav

विद्यार्थीनी तिच्या मित्रासोबत कॅम्पसमधील मोकळ्या जागेत बसली होती. यावेळी दोन जणांनी विद्यार्थीनिच्या पुरुष मित्रावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी तिला झुडपात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात डेक्कन हेराल्डने वृत्त दिले आहे.

Advertisement

Eknath Shinde कडून विनोद कांबळीला 5 लाखांची मदत; प्रताप सरनाईक यांनी घेतली हॉस्पिटल मध्ये भेट

Dipali Nevarekar

आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आकृती हॉस्पिटल मध्ये जाऊन विनोद कांबळीची भेट घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

Kazakhstan Plane Crash:अझरबैझान च्या Aktau Airport वर Baku-Grzony Flight J28243 झाले क्रॅश

Dipali Nevarekar

Embraer च्या ERJ-190AR विमानात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे.

Palghar: पालघरमध्ये मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

Shreya Varke

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका न्यायालयाने 2021 मध्ये एका मानसिक आजारी 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही. चौधरी-इनामदार यांनी मंगळवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विक्रमगड परिसरातील दशरथ मारुती (४५) याच्याविरुद्ध फिर्यादीने सर्व आरोप सिद्ध केले आहेत.

Bihar: कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा विद्यार्थी झाला सायबर गुन्हेगार, पोलिसांनी कारवाई करून केली अटक

Shreya Varke

बिहारमध्ये सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील छटौनी पोलीस स्टेशन परिसरातील संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Advertisement

National Bird Of US: नवीन राष्ट्राध्यक्षांसोबतच अमेरिकेला मिळाला नवा राष्ट्रीय पक्षी; Bald Eagle राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित

Bhakti Aghav

पांढरे डोके, पिवळी चोच आणि तपकिरी शरीराने ओळखू येणारा ‘बाल्ड ईगल’ 240 वर्षांपासून राष्ट्राचे प्रतीक आहे. हा एक अतिशय शक्तिशाली पक्षी मानला जातो. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेला हा नवा राष्ट्रीय पक्षी मिळाला आहे.

Varanasi Crime: 8 वर्षीय नहिराची हत्या, शाळेच्या आवारात गोणीत आढळला मृतदेह

Shreya Varke

यूपीच्या वाराणसीमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण समाज हादरला आहे. येथील रामनगर भागात शाळेच्या आवारात 8 वर्षीय अपंग मुलगी नहिराचा निर्वस्त्र मृतदेह गोणीत भरलेला आढळून आला आहे. नहिरा मंगळवारी संध्याकाळी काही वस्तू घेण्यासाठी घरातून निघाली होती आणि त्यानंतर ती परतलीच नाही. यानंतर त्याचे वडील शेहजादे यांनी त्याचा शोध सुरू करून पोलिसांना माहिती दिली, मात्र ती कुठेच सापडली नाही.

Baby John Review: वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांचा 'बेबी जॉन' मनोरंजक कथा आणि सामाजिक संदेशाने परिपूर्ण

Shreya Varke

'बेबी जॉन' हा एक असा चित्रपट आहे जो मनोरंजनासोबतच सामाजिक विषयांवर खोलवर छाप सोडतो. वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांसारख्या प्रतिभावान कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट कॅलिसने दिग्दर्शित केला आहे. त्याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून, त्याने आपल्या दिग्दर्शनाने हा खास अनुभव घेतला आहे.

Raigad Fire: रायगड-खंडाळा घाटात रसायन भरलेला टॅंकर पलटी; परिसरात भीषण आग

Dipali Nevarekar

मुंबई पुणे हायवे वर 200 मीटर पर्यंत आग भडकली आहे.

Advertisement

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत 15,000 रुपयांपर्यंत वाढवणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Bhakti Aghav

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत लवकरच 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पुण्यात घोषणा केली आहे.

MHADA Konkan Board Lottery 2024: कोकण विभागातील घरांसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ; 6 जानेवारी पर्यंत करा housing.mhada.gov.in वर अर्ज

Dipali Nevarekar

housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज आणि नोंदणी करता येणार आहे.

Arvind Kejriwal's Sensational Claim: दिल्ली निवडणुकीपूर्वी खोट्या प्रकरणात मुख्यमंत्री आतिशी यांना लवकरच अटक करण्यात येणार; अरविंद केजरीवाल यांचा दावा

Bhakti Aghav

केजरीवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेमुळे काही लोक त्रस्त आहेत. त्यांनी येत्या काही दिवसांत खोटा खटला तयार करून अतिशीजींना अटक करण्याची योजना आखली आहे. त्याआधी 'आप'च्या वरिष्ठ नेत्यांवर छापे टाकण्यात येणार आहेत. याबाबत मी आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.'

Car-Bus Collision In Rajasthan: राजस्थानच्या करौली येथे बस आणि कारची धडक; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Bhakti Aghav

राजस्थानमधील करौली जिल्ह्यात (Karauli District) खासगी बस आणि कारमध्ये जोरदार धडक (Car-Bus Collision) झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील 15 प्रवासीही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Baby Gorilla Viral Video: बॉक्समध्ये केली जात होती बेबी गोरिलाची तस्करी, इस्तंबूल विमानतळावर केली सुटका

Shreya Varke

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुर्कस्तानमधील अधिकाऱ्यांनी एका तस्करीत बेबी गोरिलाची सुटका केली आहे. बेबी गोरिलाला एका बॉक्समध्ये नायजेरियातून थायलंडमधून तुर्कीमार्गे नेले जात होते. , पण हे कळताच इस्तंबूल विमानतळावर शिपमेंट थांबवून गोरिलाची सुटका करण्यात आली. तुर्कीच्या कृषी आणि वन मंत्रालयाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Odisha: पारादीप बंदरातून दोन संशयित कबूतर पकडले, पायात बांधलेली होती विद्युत उपकरणे

Shreya Varke

ओडिशातील पारादीप इंटरनॅशनल कार्गो टर्मिनलमधून दोन संशयास्पद कबूतर पकडले गेले आहेत, जे पाळत ठेवणारी उपकरणे घेऊन जात असल्याचा संशय होता. पक्ष्यांच्या पायाला छोटी विद्युत उपकरणे जोडलेली आढळली आहेत. वास्तविक, पारादीप बंदराच्या प्रतिबंधित भागात पहिल्यांदा कबुतरे दिसली, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये चिंता पसरली.

Atal Bihari Vajpayee’s 100th Birth Anniversary: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी 'Sadaiv Atal' Memorial वर अर्पण केली पुष्पांजली (Watch Video)

Dipali Nevarekar

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सदैव अटल या अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपली आदरांजली अर्पण केली आहे.

Atal Bihari Vajpayee’s 100th Birth Anniversary: भारतात 25 डिसेंबर Good Governance Day म्हणून का साजरा केला जातो? घ्या जाणून

Dipali Nevarekar

भारत सरकार कडून Good Governance Day हा पहिल्यांदा 2014 साली घोषित करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement