ठळक बातम्या
Delhi Airport Issues Advisory For Passengers: दिल्लीत दाट धुके, IGI विमानतळ प्रवाशांसाठी ॲडव्हायझरी जारी; अनेक भागात AQI 350 पार
Bhakti Aghavराजधानीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे प्रभावित होण्याची शक्यता आहे. दिल्ली विमानतळाने याबाबत सूचना जारी केली आहे. ॲडव्हायझरीनुसार, CAT III चे पालन न करणाऱ्या फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो.
Christmas 2024: ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी Santa Claus चं वाळूशिल्प साकारत रचला विक्रम (Watch Video)
Dipali Nevarekarआज नाताळच्या सणानिमित्त सर्वत्र आनंदाचं, चैतन्याचं वातावरण आहे.
Pakistan Airstrike On Afghanistan: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू
Bhakti Aghavपाकिस्तानी हवाई हल्ल्याने तालिबान हैराण झाले आहेत. खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हवाई हल्ल्याची चौकशी केली जात असून त्याची पुष्टी करण्यासाठी आणि हल्ल्याची जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास करणे आवश्यक आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बर्मल, पक्तिका येथे हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले आहे.
Lasith Malinga Singing: क्रिकेटनंतर लसिथ मलिंगाने संगीताच्या क्षेत्रात केला प्रवेश, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeश्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने आपल्या घातक यॉर्कर गोलंदाजीने क्रिकेट जगतात एक खास ओळख निर्माण केली आहे. अगदी मोठे फलंदाजही त्याच्या चेंडूंसमोर झुंजताना दिसले. मलिंगाने आपल्या खास शैली आणि अचूकतेने क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता कोचिंग क्षेत्रात सक्रिय आहे आणि नवीन प्रतिभावान गोलंदाज तयार करण्यात योगदान देत आहे.
Cold Wave Alert: देशात नववर्षापूर्वी पारा आणखी घसरणार; दाट धुके आणि थंडीच्या लाटेचा इशारा
Shreya Varkeराजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. उत्तर भारतातील पर्वतांवर बर्फवृष्टी होत असून मैदानी राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे लोक कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. दरम्यान, पावसासोबतच पुढील पाच ते सात दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Merry Christmas 2024 HD Images: ख्रिसमस सणानिमित्त Wallpapers, Wishes, Greetings शेअर करून मित्रपरिवाराला द्या नाताळ सणाच्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीया दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियावर तसेच प्रत्येक्षात भेटून नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील ख्रिसमस निमित्त सोशल मीडियावर HD Images, Greetings, Quotes, Wishes शेअर करून तुमच्या मित्र-परिवारासोबत नाताळ सणाचा आनंद द्वगुणित करू शकता. यासाठी तुम्ही खालील HD ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Karnataka: मंगळुरू येथील पिलिकुला बायोलॉजिकल पार्कमध्ये 14 वर्षीय राणी वाघिणीने 2 बछड्यांना दिला जन्म
Jyoti Kadamपिलिकुला बायोलॉजिकल पार्कमधील 14 वर्षांच्या वाघिणीने नुकतेच दोन बछड्यांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी ही 14 वर्षीय राणी वाघिणीने 2 बछड्यांना जन्म दिला आहे.
Merry Christmas 2024 Messages: ख्रिसमस निमित्त Images, Greetings, Quotes, Wishes द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा नाताळ सण!
टीम लेटेस्टलीयेशू ख्रिस्ताचा जन्म देखील प्रकाश आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी लोक एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील ख्रिसमस वॉलपेपर, ख्रिसमसच्या शुभेच्छा, ख्रिसमस ग्रीटिंग्ज, ख्रिसमस स्टेटस, मेरी ख्रिसमस मेसेज शेअर करून आपल्या मित्र-परिवारास सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा पाठवू शकता.
Dhanbad Crime: हॉस्पिटलच्या सफाई कर्मचाऱ्याकडून अपंग मुलीवर बलात्कार, जमावाचा आरोपीच्या घराला घेराव
Jyoti Kadamधनबाडमधील सेंट्रल हॉस्पिटलच्या सफाई कामगाराने एका अपंग मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी पिडितेचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी आरोपीचे घर पेटवून दिले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Manipur New Governor: अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती
Amol Moreविजय कुमार सिंह यांना मिझोरामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘Shark Tank India Season 4’: 'शार्क टँक पाकिस्तान हास्यास्पद'; Shaadi.com चे संस्थापक Anupam Mittal यांनी व्यक्त केल्या भावना (LatestLY Exclusive)
Jyoti Kadamलोकप्रिय बिझनेस रिॲलिटी शो 'शार्क टँक इंडिया' सीझन 4 लवकरच येणार आहे. शार्क अनुपम मित्तल यांनी लेटेस्टलीशी संवाद साधताना शो आणि 'शार्क टँक पाकिस्तान' बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
IND W Beat WI W 2nd ODI 2024: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 115 धावांनी विजय, प्रिया मिश्राने घेतल्या 3 विकेट
Amol Moreहरलीन देओलने भारतीय संघाच्या फलंदाजीत चमकदार कामगिरी करत 103 चेंडूत 115 धावा केल्या. त्याच्या खेळीत 16 चौकारांचा समावेश होता. तिच्यासोबत प्रतिका रावलनेही उत्कृष्ट 76 धावा केल्या आणि स्मृती मानधना हिने 53 धावांची शानदार खेळी केली.
Pune Accident: पुणे वानवडीमध्ये अपघातानंतर पोलीस उपायुक्तांनी वाचवले तरुणाचे प्राण
Amol Moreपोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय कलेचा वापर करुन तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेनंतर नागरिकांनी भाजीभाकरे यांचे कौतुक केले.
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचा ट्रक 300 फूट खोल खड्ड्यात पडला, 5 जवानांचा मृत्यू
Jyoti Kadamलष्कराच्या वाहनाचा झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला. तेथे बचावकार्य सुरू असून जखमी सैनिकांवर उपचार केले जात आहेत.
Stock Market Holidays in 2025: नवीन वर्षात 'इतके' दिवस शेअर बाजार राहणार बंद; सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे पहा
Jyoti Kadamनवीन वर्षात शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 2025 च्या शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Snake Enters Mumbai Courtroom: मुंबई कोर्टरूममध्ये साप, तासभर कामकाजाचा खोळंबा
Amol Moreमुलुंडमधील दंडाधिकारी न्यायालयाच्या खोली क्रमांक 27 मध्ये सुनावणी सुरू असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने फायली तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला फाईलमध्ये 2 फूट लांब साप दिसला. त्यानंतर त्यांनी फाईल फेकून दिली. त्यामुळे अराजकता निर्माण झाली.
HC on Sexual Assault Survival Medical Care: दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; बलात्कार, ॲसिड हल्ला, लैंगिक छळ आणि पॉक्सो पीडितांवर तात्काळा आणि मोफत उपचाराचे निर्देश
Jyoti Kadamबलात्कार, ॲसिड हल्ला, लैंगिक छळ आणि पॉक्सो अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा दिली जाईल, असा ऐतिहासिक आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी जारी केला.
IND W vs WI W 2nd ODI 2024 Live Score Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाला तिसरा धक्का, प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला केले बाद
Amol Moreलक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजला पहिला तिसरा मिळाला. प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. वृत्त लिहेपर्यंत वेस्ट इंडिजची धावसंख्या 41-3 (11.1 षटके) होती.