Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचा ट्रक 300 फूट खोल खड्ड्यात पडला, 5 जवानांचा मृत्यू

तेथे बचावकार्य सुरू असून जखमी सैनिकांवर उपचार केले जात आहेत.

Photo Credit- X

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. लष्कराचा एक ट्रक 300 फूट खोल दरीत कोसळून 5 सैनिक ठार तर अनेक जखमी( Poonch Army Vehicle Accident) झाले. व्हाईट नाईट कॉर्प्सने त्याबाबतची माहिती दिली. तेथे बचावकार्य सुरू असून जखमी सैनिकांवर उपचार केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यात एक वाहन रस्त्यावरून घसरले आणि दरीत कोसळले.(Jammu and Kashmir: उधमपूरमध्ये दोन पोलिसांची गोळ्या झाडून हत्या, पोलिस व्हॅनमध्ये आढळले मृतदेह (Watch Video))

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील बर्फाच्छादित गुरेझ रोडवर वाहन रस्त्यावरून घसरले होते आणि खड्ड्यात पडले होते. त्यामुळे लष्कराचे दोन जवान जखमी झाले होते. केले. दुसरीकडे, आज मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात संशयास्पद दहशतवादी हालचाली दिसून आल्या. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.

कुंटवाडा परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर ग्राम संरक्षण रक्षक (व्हीडीजी) च्या सदस्यांनी गोळीबार केला. यानंतर तेथे सुरक्षा दल आणि पोलीस तैनात करण्यात आले आहे.