Karnataka: मंगळुरू येथील पिलिकुला बायोलॉजिकल पार्कमध्ये 14 वर्षीय राणी वाघिणीने 2 बछड्यांना दिला जन्म
मंगळवारी ही 14 वर्षीय राणी वाघिणीने 2 बछड्यांना जन्म दिला आहे.
Karnataka: मंगळुरू येथील पिलिकुला बायोलॉजिकल पार्कमध्ये एका 14 वर्षांच्या राणी वाघिणीने अलीकडेच दोन बछड्यांना जन्म दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. राणी वाघिणी आणि बछडे दोघांची प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली. राणीने 2016 मध्ये पाच आणि 2021 मध्ये तीन निरोगी बठड्यांना जन्म दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पिलिकुला येथील नर वाघाच्या बदल्यात राणीला बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कमधून प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत पिलिकुला जैविक उद्यानात आणण्यात आले.
नवीन बछड्यांच्या जन्मानंतर पिलीकुला प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या 10 झाली असून त्यात चार नर आणि चार मादी आहेत. पिलिकुला बायोलॉजिकल पार्कचे संचालक एच जयप्रकाश भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात पिल्लांचे लिंग दोन महिन्यांनंतर निश्चित केले जाईल.
14 वर्षीय राणी वाघिणीने 2 बछड्यांना दिला जन्म