ठळक बातम्या

Gujarat Train Derailment: दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस सुरतमधील किम स्टेशनवर रुळावरून घसरली, कोणतीही दुखापत नाही (See Pics and Video)

Jyoti Kadam

दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेसचा मंगळवारी दुपारी गुजरातमधील सुरतच्या किम स्थानकावरून निघताना इंजिनाशेजारी असलेला प्रवासी नसलेला डबा रुळावरून घसरला.

ICC Champions Trophy 2025 Schedule Announced: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, या दिवशी दुबईमध्ये होणार भारत विरुद्ध पाकिस्तानचा महा मुकाबला

Amol More

या स्पर्धेचा सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे होणार आहे. 23 फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे.

IND W vs WI W 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला दिले 359 धावांचे लक्ष्य, हरलीन देओलचे शानदार शतक

Amol More

हरलीनने 103 चेंडूत 16 चौकारांसह 115 धावांचे शानदार शतक झळकावले. सलामीवीर स्मृती मानधनाने 53 धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली.

Gujarat Child Trafficking Case: पुतण्याच्या कर्जामुळे त्रस्त बापाने पोटच्या लेकीचा केली सौदा; राजस्थानमध्ये नेऊन..., आरोपी फरार

Jyoti Kadam

राजस्थानमधील अजमेरमध्ये एका पित्याने आपल्या मुलीशी सौदा केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: गर्भातील मूल आपले नसल्याचा संशय; वाळूज येथे गर्भवती महिलेची पतीकडून बेदम मारहाण, आरोपी अटकेत

Jyoti Kadam

मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याने तिच्या मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगरमध्ये घडली आहे. या ्रकरणी सासरच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

SANGEET MANAPMAAN Trailer: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर लाँच, सुबोध भावेची मुख्य भूमिका

Amol More

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान नाटक आता रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या सिनेमाचा

Dadar Porbandar Express Accident: दादर पोरबंदर एक्सप्रेस किम स्टेशनवरून निघताना रूळावरून घसरली; सुदैवाने जीवितहानी नाही

Dipali Nevarekar

किम स्टेशनवरून निघताना सौराष्ट्र एक्सप्रेस पटरी वरून खाली उतरल्याचं समोर आलं आहे.

Sandhya Theatre Stampede Case: हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या बाऊन्सरला अटक; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Bhakti Aghav

संध्या थिएटर चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा अल्पवयीन मुलगा गंभीरपणे जखमी झाला. थिएटरमधील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते थिएटरमध्ये जाताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओंमध्ये, त्याचे बाउंसर गर्दीला धक्काबुक्की करताना आणि बाहेर ढकलताना दिसत आहेत.

Advertisement

Smriti Mandhana ICC Rankings: स्मृती मंधानाच्या दमदार कामगिरीबद्दल ICC ने रिटर्न गिफ्ट दिले, क्रमवारीत घेतली मोठी झेप

Amol More

महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोवार्ट पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीतने यामध्ये तीन स्थानांची झेप घेतली आहे. हरमनप्रीत कौर 10 व्या स्थानावर आली आहे.

RAW Agent असल्याचं भासवून जीम ट्रेनरचा कॅनेडियन महिलेवर बलात्कार; Tinder वर झाली होती भेट

Dipali Nevarekar

पीडीतेच्या जबाबानुसार, साहिलने लग्न करण्याचे वचन दिले होते आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर असताना तिला भेटला. या काळात साहिलने तिची दिल्ली आणि आग्रा येथे अनेकदा भेट घेतली होती.

Baba Vanga's Predictions That Came True in 2024: बाबा वंगा यांचे 2024 मध्ये खरी ठरलेली भाकिते कोणती घ्या जाणून, 2025 साठीही केलीत अनेक भाकीत

Shreya Varke

बाबा वंगा यांनी केलेल्या अनेक चित्तथरारक भाकिते या वर्षी खरी ठरल्याचे दिसून येत आहे, कारण तिला आर्थिक संकट आणि हवामानाच्या संकटाची पूर्वकल्पना होती. वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा या नावानेही ओळखले जाणारे, बाबा एक अंध बल्गेरियन होते जे पूर्व युरोपमध्ये विसाव्या शतकाच्या मध्यात तिच्या कथित पूर्वज्ञान शक्तीसाठी प्रसिद्ध झाले. तिचा जन्म 1911 मध्ये झाला होता आणि जेव्हा ती फक्त 12 वर्षांची होती

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरींची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते.

Advertisement

Blast At Ammunition Factory At Turkey: तुर्कीमध्ये दारूगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 12 ठार, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

बालिकेसिर प्रांतात असलेल्या कारखान्याच्या कॅप्सूल उत्पादन सुविधेत हा स्फोट झाला, असे सरकारी अनादोलू एजन्सीने सांगितले. बालिकेसीरचे राज्यपाल इस्माईल उस्ताओग्लू यांनी सांगितले की, स्फोटामुळे कॅप्सूल उत्पादनाची इमारत कोसळली आणि आजूबाजूच्या इमारतींचे किरकोळ नुकसान झाले.

Smriti Mandhana Half Century: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही स्मृती मंधानाचे अर्धशतक, प्रतिका रावलची ही 76 धावांची खेळी

Amol More

दुसऱ्या सामन्याची भारताची सुरुवात देखील आक्रमक झाली. मंधानाने 47 चेंडूत 53 धावा करुन बाद झाली. आपल्या या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. तर प्रतिका रावलने देखील 86 चेंडूत 76 धावा करुन सध्या क्रिजवर आहे.

Param Sundari: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जान्हवी कपूर स्टारर 'परम सुंदरी' 25 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

Shreya Varke

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जान्हवी कपूर स्टारर 'परम सुंदरी' या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला असून चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. दिनेश व्हिजन प्रस्तुत हा चित्रपट तुषार जलोटा यांनी दिग्दर्शित केला आहे. ही रोमँटिक प्रेमकथा पुढील वर्षी २५ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा उत्तरेकडील मुलगा आणि दक्षिणेतील मुलगी यांच्यातील अनोख्या नातेसंबंधावर आधारित आहे.

Mumbai Shocker: कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्तीने लोकल ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या

Shreya Varke

कर्जाला कंटाळून मुंबईतील एका शासकीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनंतर पोलिसांनी ३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साहू सदाशिव माने असे मृताचे नाव आहे. जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर तो बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. तो मुंबईच्या सायन येथील प्रतीक्षा नगर येथील रहिवासी होता.

Advertisement

Python Spotted on Tree in Thane: ठाण्यात तुलसीधाम, वसंत विहार मध्ये झाडावर अजगर पाहून स्थानिक धास्तावले; प्रशासनाकडून सुखरूप सुटका (Watch Video)

Dipali Nevarekar

ठाण्यात फायर ब्रिग्रेडच्या अधिकार्‍यांनी सापाची एका झाडावरून सुखरूप सुटका केली आहे.

Indian Drugs Smuggler Killed In California: कॅलिफोर्नियामध्ये भारतीय ड्रग्स तस्कर ठार, बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी

Bhakti Aghav

सुनील यादवची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केली होती. खुद्द लॉरेन्स गँगने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची कबुली दिली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॉकटन शहरात ड्रग्ज तस्कर सुनील यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Tirumala Tirupati Devasthanam Online Tickets: तिरुपती मंदिरात वैकुंठ एकादशीच्या दर्शनाचे तिकीट बुकिंग सुरू; अशा प्रकारे बुक करा ऑनलाईन तिकीट

Bhakti Aghav

भाविक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बुकिंग करू शकतात. यासाठी भाविकांना 300 रुपयांच स्पेशल एंट्री दर्शन (SED) तिकिटे उपलब्ध असतील. सामान्य यात्रेकरूंसाठी स्लॉटेड सर्व दर्शन (SSD) टोकन तिरुमला येथील कौस्तुभम अतिथीगृह आणि तिरुपतीमधील आठ नियुक्त काउंटरवर वितरित केले जातील.

Shyam Benegal Last Rites: ज्येष्ठ सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात होणार दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Dipali Nevarekar

श्याम बेनेगल हे पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहेत.

Advertisement
Advertisement