Tirumala Tirupati Devasthanam Online Tickets: तिरुपती मंदिरात वैकुंठ एकादशीच्या दर्शनाचे तिकीट बुकिंग सुरू; अशा प्रकारे बुक करा ऑनलाईन तिकीट

यासाठी भाविकांना 300 रुपयांच स्पेशल एंट्री दर्शन (SED) तिकिटे उपलब्ध असतील. सामान्य यात्रेकरूंसाठी स्लॉटेड सर्व दर्शन (SSD) टोकन तिरुमला येथील कौस्तुभम अतिथीगृह आणि तिरुपतीमधील आठ नियुक्त काउंटरवर वितरित केले जातील.

Tirumala Temple (फोटो सौजन्य - X/@SadaaShree)

Tirumala Tirupati Devasthanam Online Tickets: तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirumala Tirupati Devasthanam TTD) ने तिरुमला (Tirumala) येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील (Lord Venkateswara Temple) वैकुंठ द्वार दर्शनासाठी (Vaikunta Dwara Darshan) ऑनलाइन तिकिट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. भाविक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बुकिंग करू शकतात. यासाठी भाविकांना 300 रुपयांच स्पेशल एंट्री दर्शन (SED) तिकिटे उपलब्ध असतील. सामान्य यात्रेकरूंसाठी स्लॉटेड सर्व दर्शन (SSD) टोकन तिरुमला येथील कौस्तुभम अतिथीगृह आणि तिरुपतीमधील आठ नियुक्त काउंटरवर वितरित केले जातील.

वैकुंठ द्वारम या कालावधीत राहणार खुला -

दरम्यान, 10 जानेवारी 2025 रोजी तिरुमला मंदिरात शुभ वैकुंठ एकादशी साजरी केली जाईल. गर्भगृहाला वेढून सर्वात आतील बाजू असलेला वैकुंठ द्वारम 10 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत भाविकांसाठी खुला राहील. वैध दर्शन तिकीट असलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी परवानगी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तथापि, टोकन नसलेल्या व्यक्ती मंदिराच्या शहराला भेट देऊ शकतात, परंतु त्यांना दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नाही. (Tirumala Tirupati Devasthanam: 'स्वैच्छिक सेवानिवृत्ती किंवा बदली घ्या'; तिरुपती मंदिर मंडळाची गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना आदेश, कायद्यात केला बदल)

व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन -

TTD (तिरुमला तिरुपती देवस्थानम) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भक्त त्यांचे तिकीट बुक करू शकतात. व्हीआयपींसाठी, वैकुंठ एकादशीच्या दिवशी (10 जानेवारी) पहाटे 4:45 वाजता प्रोटोकॉल दर्शन सुरू होईल, त्यानंतर सकाळी 9 ते 11 या वेळेत सुवर्ण रथाची भव्य मिरवणूक निघेल. द्वादशी दिवशी (11 जानेवारी) सकाळी 5.30 ते 6:30 या वेळेत मंदिराच्या तलावात चक्रस्नानम विधी पार पाडले जातील. (Tirupati Balaji Temple in Maharashtra: राज्याला मिळणार नवे तीर्थस्थळ; नवी मुंबईमध्ये CM Ekanth Shinde यांच्या हस्ते तिरूमला तिरुपती देवस्थान बालाजी मंदिराचे भूमिपूजन)

प्रसादासाठी 3.5 लाख लाडूंचा स्टॉक -

भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अन्नदानम (विनामूल्य अन्न वितरण) उत्सवादरम्यान सकाळी 6 ते मध्यरात्री 12 पर्यंत अखंडितपणे प्रदान केले जाईल. टीटीडीने मागणी पूर्ण करण्यासाठी 3.5 लाख लाडूंचा बफर स्टॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वैकुंठद्वाराच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक या उत्सवादरम्यान डोंगरी मंदिरात गर्दी करतात.