RAW Agent असल्याचं भासवून जीम ट्रेनरचा कॅनेडियन महिलेवर बलात्कार; Tinder वर झाली होती भेट
या काळात साहिलने तिची दिल्ली आणि आग्रा येथे अनेकदा भेट घेतली होती.
यूपी मध्ये एका भारतीय वंशाच्या कॅनेडियन महिलेची तरूणाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. साहिल शर्मा असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. Research and Analysis Wing अर्थात रॉ चा एजंट असल्याचं सांगून त्याने हे अत्याचार केल्याचं महिलेने सांगितलं आहे. या दोघांची ओळख डेटिंग अॅप टिंडर वर झाली आहे. मुलीचा विश्वास संपादन करण्यासाठी साहिलने आपण इंटेलिजन्स ऑफिसर असल्याचं भासवलं होतं.
रिपोर्ट्सनुसार, महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये ती पहिल्यांदा साहिलला मार्च मध्ये भेटल्याचं सांगितलं. भारत भेटीवर आलेल्या महिलेला तो 20 मार्चला हॉटेल मध्ये डिनरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने भेटला. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने पिझ्झा आणि सॉफ्ट ड्रिंक्सची सोय केली होती. त्याचे सेवन केल्यानंतर काही वेळातच तिची शुद्ध हरपली होती.
पुन्हा शुद्ध अल्यानंतर तिला स्वतःवर बलात्कार झाल्याचं समजलं. तिने साहिलला जाब विचारला. तो RAW एजंट असल्याचा दावा करून त्याने कथितपणे तिला धीर दिला आणि त्याच्या जीवाला धोका आहे, म्हणूनच त्याला गुप्तता राखण्याची गरज आहे, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
साहिलने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान भारत भेटीदरम्यान तो तिला भेटत राहिला. या काळात साहिलने तिच्यासोबत दिल्ली आणि आग्रा येथे अनेक भेटी घेतल्याचे पीडितेने सांगितले. तिने आरोप केला आहे की त्याने तिला त्यांच्या व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल लॉग हटविण्यास भाग पाडले, त्याची गुप्त ओळख संरक्षित करण्याची गरज आहे. असा बहाणा केला.
महिलेने FIR मध्ये साहिलच्या दोन मित्रांचीही नावे नोंदवली आहेत. त्यापैकी आरिफ अली याने स्वत:ची ओळख पोलीस अधिकारी म्हणून दिली. तिने आरोप केला की आरिफने नंतर तिला अश्लील छायाचित्रे वापरून ब्लॅकमेल केले, जे साहिलने शेअर केल्याचा त्याने दावा केला.
कॅनडाला परतल्यानंतर पीडितेला ती गरोदर असल्याचे समजले आणि फेसबुक मेसेंजरद्वारे साहिलला माहिती दिली. मात्र, त्याने तिला लगेच ब्लॉक केले आणि सर्व संवाद तोडला. रिपोर्टनुसार, महिलेने तिच्या तक्रारीत साहिलवर तिचे नग्न फोटो डार्क वेबवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचा, तिला नैराश्यात ढकलण्याचा आणि वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचा आरोप केला आहे.