Dadar Porbandar Express Accident: दादर पोरबंदर एक्सप्रेस किम स्टेशनवरून निघताना रूळावरून घसरली; सुदैवाने जीवितहानी नाही

किम स्टेशनवरून निघताना सौराष्ट्र एक्सप्रेस पटरी वरून खाली उतरल्याचं समोर आलं आहे.

Rail Accident | X @Rajendra B. Aklekar

दादर पोरबंदर एक्सप्रेसला (19015)  गुजरात मध्ये अपघात झाला आहे. किम स्टेशनवरून निघताना ही ट्रेन रूळावरून घसरली आहे. इंजिनाशेजारी जोडलेल्या प्रवासी नसलेल्या कोचची (VPU) 4 चाके रुळावरून घसरली आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या रेल्वे पुन्हा पटरीवर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्रेनची सामान्य सेवा सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दादर पोरबंदर एक्सप्रेसला अपघात

पश्चिम रेल्वेची माहिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)