ICC Champions Trophy 2025 Schedule Announced: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, या दिवशी दुबईमध्ये होणार भारत विरुद्ध पाकिस्तानचा महा मुकाबला
23 फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे.
ICC Champions Trophy 2025 Schedule: आईसीसी ने आईसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि UAE मध्ये खेळवली जाईल. आठ संघांदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची ही 15 वी आवृत्ती आहे. गेल्या वेळी 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते. या वेळी या स्पर्धेत, पाकिस्तान 1996 नंतर प्रथमच जागतिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तर UAE हे तटस्थ ठिकाण म्हणून निवडले गेले आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जातील आणि आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. (हेही वाचा - IND vs AUS 4th Test 2024: केएल राहुलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, मेलबर्न कसोटीत करणार 'ही' कामगिरी)
पाहा पोस्ट -
या स्पर्धेचा सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे होणार आहे. 23 फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबईत तर दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवला जाईल. अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोर येथे होणार आहे. मात्र, भारताने अंतिम फेरी गाठल्यास हा सामना दुबईत होणार आहे.
तारीख | सामना | स्थान |
---|---|---|
19 फेब्रुवारी | पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड | नेशनल स्टेडियम, कराची |
20 फेब्रुवारी | बांग्लादेश विरुद्ध भारत | दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम |
21 फेब्रुवारी | अफगानिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रीका | नेशनल स्टेडियम, कराची |
22 फेब्रुवारी | ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
23 फेब्रुवारी | पाकिस्तान विरुद्ध भारत | दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम |
24 फेब्रुवारी | बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड | रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम |
25 फेब्रुवारी | ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका | रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम |
26 फेब्रुवारी | अफगानिस्तान विरुद्ध इंग्लंड | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
27 फेब्रुवारी | पाकिस्तान विरुद्धबांग्लादेश | रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम |
28 फेब्रुवारी | अफगानिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
1 मार्च | दक्षिण अफ्रीका विरुद्ध इंग्लंड | नेशनल स्टेडियम, कराची |
2 मार्च | न्यूझीलंड विरुद्ध भारत | दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम |
4 मार्च | पहिला सेमीफाइनल | दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम |
5 मार्च | दूसरा सेमीफाइनल | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
9 मार्च | फाइनल | गद्दाफी स्टेडियम, लाहोर |
1998 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेला आधी आयसीसी नॉकआउट ट्रॉफी असे म्हटले जात होते. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक वेळा (प्रत्येकी दोन) जिंकले आहेत. 2017 मध्ये पाकिस्तानने हे विजेतेपद पटकावले होते. भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत असताना चाहत्यांच्या नजरा आता 23 फेब्रुवारीला दुबईत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.