Anna University Student Raped Inside Campus: चेन्नईतील अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवर कॅम्पसमध्ये बलात्कार, आरोपींविरोध गुन्हा दाखल

यावेळी दोन जणांनी विद्यार्थीनिच्या पुरुष मित्रावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी तिला झुडपात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात डेक्कन हेराल्डने वृत्त दिले आहे.

Anna University Campus, Rape प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay,annauniv.edu)

Anna University Student Raped Inside Campus: चेन्नई (Chennai) तील प्रतिष्ठित अण्णा विद्यापीठाच्या कॅम्पस (Anna University Campus) मध्ये बुधवारी सकाळी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) करण्यात आला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी दोन पुरुषांनी तिच्या पुरुष मित्राला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेदम मारहाण केली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थीनी तिच्या मित्रासोबत कॅम्पसमधील मोकळ्या जागेत बसली होती. यावेळी दोन जणांनी विद्यार्थीनिच्या पुरुष मित्रावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी तिला झुडपात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात डेक्कन हेराल्डने वृत्त दिले आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेजची तपासणी -

यावेळी पीडित विद्यार्थिनीसोबत असलेला पुरुष मित्र हा देखील अण्णा विद्यापीठातील विद्यार्थी आहे. हल्लेखोर बाहेरचे आहेत की, विद्यार्थी हे शोधण्यासाठी पोलिस कॅम्पसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तथापी, पीडित विद्यार्थीनीचा मित्र हा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून तो कॅम्पसमधील वसतिगृहात राहतो. (हेही वाचा -Palghar: पालघरमध्ये मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा)

चेन्नई पोलिसांनी दाखल केला गुन्हा -

याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विरोधी पक्षनेते एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर टीका करत ते तामिळनाडूमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम नसल्याचं म्हटलं आहे. तथापी, तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी सांगितले की, राज्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही कारण विरोधकांना शांत करण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. (हेही वाचा -Dindoshi Rape Case: 30 वर्षीय बापाचा पोटच्या 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)

दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पसमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. 22 वर्षीय विद्यार्थीनीला तीन पुरुषांनी वेठीस धरले, विवस्त्र केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित विद्यार्थीनी एका मित्राला भेटण्यासाठी वसतिगृहातून बाहेर पडली होती.