Arvind Kejriwal's Sensational Claim: दिल्ली निवडणुकीपूर्वी खोट्या प्रकरणात मुख्यमंत्री आतिशी यांना लवकरच अटक करण्यात येणार; अरविंद केजरीवाल यांचा दावा
त्यांनी येत्या काही दिवसांत खोटा खटला तयार करून अतिशीजींना अटक करण्याची योजना आखली आहे. त्याआधी 'आप'च्या वरिष्ठ नेत्यांवर छापे टाकण्यात येणार आहेत. याबाबत मी आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.'
Arvind Kejriwal's Sensational Claim: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांना लवकरच खोट्या प्रकरणात अटक (Arrest) होण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. केजरीवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेमुळे काही लोक त्रस्त आहेत. त्यांनी येत्या काही दिवसांत खोटा खटला तयार करून अतिशीजींना अटक करण्याची योजना आखली आहे. त्याआधी 'आप'च्या वरिष्ठ नेत्यांवर छापे टाकण्यात येणार आहेत. याबाबत मी आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.'
AAP नेत्यांवर छापे टाकण्यात येणार -
केजरीवाल यांनी दावा केला आहे की, पक्षाच्या प्रशासनाची रचना अस्थिर करण्याच्या कथित प्रयत्नाचा एक भाग म्हणून वरिष्ठ AAP नेत्यांवर छापे टाकले जाऊ शकतात. याबाबात अधिक बोलण्यासाठी आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. केजरीवाल यांनी हा दावा अशा वेळी केला आहे, जेव्हा आप सरकार दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या कल्याणकारी योजना आणत आहे. (हेही वाचा -Atishi Takes Oath as CM of Delhi: आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ; बनल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री (Watch Videos))
महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना -
महाराष्ट्राच्या लाडली बहना योजनेवर आधारित, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य करण्यात येते. आगामी विधानसभा निवडणूकीत 'आप' पुन्हा निवडून आल्यास ही रक्कम 2,100 रुपये करण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. तथापी, ज्येष्ठ नागरिकांच्या उद्देशाने, हा उपक्रम 60 आणि त्याहून अधिक वयाच्या दिल्लीतील रहिवाशांना मोफत आरोग्यसेवेचे वचन देतो. यात सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाचा समावेश आहे. (हेही वाचा - Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी; अरविंद केजरीवाल आणि आतिशी कोठून निवडणूक लढवणार? वाचा)
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना केजरीवाल यांच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सध्या दिल्लीकर आणि राजकीय निरीक्षक आता केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेची वाट पाहत आहेत. या पत्रकार परिषदेत केजरीवाल आप विरोधातील षड्यंत्रावर अधिक तपशील उघड करण्याची शक्यता आहे.