Atal Bihari Vajpayee’s 100th Birth Anniversary: भारतात 25 डिसेंबर Good Governance Day म्हणून का साजरा केला जातो? घ्या जाणून
भारत सरकार कडून Good Governance Day हा पहिल्यांदा 2014 साली घोषित करण्यात आला आहे.
भारतामध्ये 25 डिसेंबर हा दिवस Good Governance Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी या दिवसाचं महत्त्व थोडं अधिक आहे. वाजपेयींच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. यंदाचं वर्ष हे अटल बिहारी वाजपेयी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे कामामध्ये पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठता ही जनसामान्यांचं हित लक्षात घेऊन करण्याचा सरकारचा मानस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकार मध्ये या दिवसाची घोषणा केली आहे. या दिवसानिमित्त सरकारी यंत्रणांमध्ये कामाच्या जबाबदारीचं भान आणि प्रभावी सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली जाते. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
अटल बिहारी वाजपेयी एक द्र्ष्टा नेता
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे झाला. त्यांनी 3 वेळेस भारताचे पंतप्रधान पद भूषवले आहे. वाजपेयींचं अमोघ वक्तृत्व आणि कविता ही त्यांची ओळख होती. वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्षपद भूषवणारे पहिले नेते होते. त्यांना 2015 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते.
वाजपेयींच्या कार्यकाळात किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम आदी उपक्रम सुरू झाले. या धोरणाने ग्रामीण विकास आणि शिक्षणात अनेक सुधारणा आणि सुधारणांचा पाया घालण्यात आला.
वाजपेयींच्या जन्मशताब्दीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( 25 डिसेंबर) मध्य प्रदेशातील खजुराहो येथे विकास प्रकल्प आणि उपक्रमांच्या मालिकेचे अनावरण करण्यासाठी भेट देत आहेत. वाजपेयींच्या स्मरणार्थ पीएम मोदी विशेष मुद्रांक आणि नाणे जारी करणार आहेत. वाजपेयींच्या 100 व्या जन्मदिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, सरकारने 19-25 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह (गुड गव्हर्नन्स वीक) आयोजित केला आहे, ज्यामध्ये सेवा वितरण आणि प्रशासनाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पुढाकारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.