MHADA Konkan Board Lottery 2024: कोकण विभागातील घरांसाठी दुसर्यांदा मुदतवाढ; 6 जानेवारी पर्यंत करा housing.mhada.gov.in वर अर्ज
housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज आणि नोंदणी करता येणार आहे.
MHADA कडून कोकण विभागीय मंडळातील घरांच्या लॉटरीसाठी दुसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 6 जानेवारी पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार आहे. म्हाडा कडून डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला देण्यात आलेल्या माहितीनुसार, या लॉटरीमध्ये घरांची संख्या 12 हजाराहून 16 हजार करण्यात आली आहे. या 16 हजार घरांमधील 2200 घरं ही लकी ड्रॉ च्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होतील तर उर्वरित 14 हजार घरं ही first-come, first-served माध्यमात उपलब्ध केली जातील. https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज आणि नोंदणी करता येणार आहे.
म्हाडाची घरं कुठे आहेत उपलब्ध?
म्हाडाची किफायतशीर घरं ही प्रथम येणार्यास प्राधान्य तत्त्वावर दिली जातील. ही घरं 15-20 लाखांच्या दरात असतील. विरार, ठाणे, कल्याण भागात ही घरं उपलब्ध असतील. लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध होणारी घरं ही प्रामुख्याने ठाणे शहरात अअहेत. सोबतच कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ओरस आणि वेंगुर्ला, मालवण मध्ये ही घरं उपलब्ध असणार आहेत. म्हाडा लॉटरी मधील घरं 15 लाख ते 1 करोडच्या दरातील आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 11ऑक्टोबरपासून सुरू आहे. परंतु, म्हाडा प्रशासनाला लॉटरीसाठी अर्जदारांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही. या कारणास्तव कोकण मंडळाने सोडत अर्ज प्रक्रियेची तारीख दुसऱ्यांदा वाढविण्याचे जाहीर केले आहे.
मुंबईमध्येही 2025 मध्ये लॉटरी
म्हाडा कडून 2 ते 3 हजार घरं मुंबई मध्येही उपलब्ध असणार आहेत. त्यासाठी मार्च आणि मे महिन्यात लॉटरी काढली जाईल असा अंदाज आहे.