ठळक बातम्या

What Is HMVP Virus? एचएमव्हीपी व्हायरस म्हणजे काय? तो Covid-19 विषाणूसारखाच धोकादायक? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) म्हणजे काय? त्याचा संसर्ग कसा वाढतो? लक्षणे आणि त्याचा परिणाम आणि तो COVID-19 सारखा धोकादायक आहे का? यांबाबत जाणून घ्या.

Yashasvi Jaiswal Sledge Sam Konstas: 'शॉट नहीं लग रहे क्या...', यशस्वी जैस्वालने सॅम कॉन्स्टासला हिंदीत केले स्लेज, मजेदार व्हिडिओ व्हायरल

Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) यांच्यात बाचाबाची झाली. पुढच्याच चेंडूवर बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर कॉन्स्टासला जोरदार प्रतिक्रिया दिली. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान पुन्हा एकदा भारतीय खेळाडू कॉन्स्टासच्या मागे लागले.

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, कांगपोकपी येथील एसपी कार्यालयावर जमावाचा हल्ला

Jyoti Kadam

मणिपूरमधील हिंसाचाराचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयावर जमावाने हल्ला केला. सायबोल गावातून केंद्रीय सुरक्षा दलांना न हटवण्यात आल्यामुळे हा हल्ला करण्यात आला.

IND vs AUS 5th Test 2024 Day 2 Scorecard: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर गारद, भारताकडे चार धावांची आघाडी; सिराज-प्रसिद्ध यांना मिळाल्या 3-3 विकेट

Nitin Kurhe

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा; 20 लाख महिलांना धक्का

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चिली जात आहे. या योजनेचा कौतुक सोहळा संपवून राज्य सरकारकारने आता निकषांची भाषा सुरु केल्याने राज्यातील महिलांमध्ये असुरक्षीतता निर्माण झाली आहे. योजेनाच चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांच्या खात्यावरुन थेट रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाणार आहे. याबाबत पहिली कारवाई धुळे जिल्ह्यात झाली आहे.

Republic Day Holiday Cancelled In Maharashtra School: प्रजासत्ताक दिनी शाळांची सार्वजनिक सुट्टी रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय, दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम अनिवार्य

Jyoti Kadam

26 जानेवारी रोजी सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी देण्यात येत होती. मात्र, आता राज्य सरकारने ही सुट्टी रद्द केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशाचा इतिहास, संस्कृती आणि भविष्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश आहे.

IND vs AUS 5th Test 2025: सिडनी कसोटीतून वाईट बातमी! दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहने सोडलं मैदान; पोहोचला हॉस्पिटलमध्ये

Nitin Kurhe

टीम इंडियाचे कर्णधार असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, स्मिथनंतर प्रसिध कृष्णाने कॅरीला केले बाद; ब्यू वेबस्टर पूर्ण केले अर्धशतक

Nitin Kurhe

सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुस-या दिवशी लंच ब्रेकनंतर सहावा धक्का लागला आहे.

Advertisement

Delhi Weather Update: दाट धुक्याचा परिणाम, 96 उड्डाणे रद्द; अनेक विमानांचा मार्ग बदलला

Jyoti Kadam

दाट धुक्यामुळे शनिवारी दिल्लीतील 96 उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक विमानांचा मार्ग बदलण्यात आला. शुक्रवारीदेखील अशीच परिस्थीती पहायला मिळाली.

IND vs AUS 5th Test 2025: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीच्या प्रश्नावर रोहितने सगळ्यांची तोंड केली बंद, म्हणाला....

Nitin Kurhe

रोहित शर्मा (Rohit Sharma) या मॅचमध्ये न खेळल्याची बरीच चर्चा झाली होती आणि आता त्यानेच या मॅचमध्ये न खेळण्याचं कारण सांगितलं आहे. दुस-या दिवशी पहिले सत्र संपले तेव्हा ब्रेक दरम्यान रोहितची एक मुलाखत टीव्हीवर दिसली ज्यामध्ये त्याने निवृत्तीपासून ते सिडनी कसोटी न खेळण्यापर्यंतच्या अनेक प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू, ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट्सवर 100 धावा पार; बुमराह-सिराज घेतल्या 2-2 विकेट्स

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दुस-या दिवशी लंच ब्रेकनंतर 5 विकेट गमावून 119 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारताच्या नावावर होते. टीम इंडियाने 26 षटकात 92 धावा खर्च केल्या, मात्र या काळात टीम इंडियाला 4 यश मिळाले. मोहम्मद सिराजने 2 तर जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णाला 1-1 विकेट मिळाली.

IND vs AUS: रोहित शर्मानंतर कोहलीला टीम इंडियातून डच्चू? इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा निर्णय होण्याची शक्यता

Amol More

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मानंतर विराट कोहलीच्या अडचणीत वाढ होणार आहे. वास्तविक, विराट कोहलीला भारतीय कसोटी संघातून काढून टाकले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीनंतर विराट कोहली बीसीसीआयच्या निवडकर्त्यांच्या निशाण्यावर आहे.

Advertisement

Mumbai Local Mega Block Update: 5 जानेवारीला मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मुंबई लोकलचा मेगाब्लॉक

Dipali Nevarekar

रविवारी 5 जानेवारीला मेन लाईन, हार्बर लाईन आणि पश्चिम लाईन वर रेल्वे सेवा मेगाब्लॉक मुळे विस्कळीत राहणार आहे.

‘Shark Tank India’ S4 Promo: Flying Beast अर्थात Gaurav Taneja शार्क टॅन्क इंडिया च्या आगामी सीझन मध्ये पीच करणार त्याचा Fitness Brand BeastLife (Watch Video)

Dipali Nevarekar

BeastLife ब्रॅन्ड द्वारा अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ज्यात whey protein, Creatine Monohydrate आणि Energy-Boosting Mass Gainers चा देखील समावेश आहे.

PAK vs SA 2nd Test 2025 Day 1: रायन रिकेल्टन आणि टेंबा बावुमाच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशी केल्या 316 धावा

Amol More

रायन रिकेल्टन आणि कर्णधार टेंबा बावुमा यांनी संघाचा डाव संभाळत 200 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. कर्णधार टेंबा बावुमाहा 179 चेंडूत 106 धावाकरून बाद झाला. रायन रिकेल्टन हा सध्या 176 धावांवर नाबाद खेळत आहे.

Nandekumar Ghodile Joins Shiv Sena: छत्रपती संभाजी नगर चे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोडली उद्धव ठाकरे यांची साथ

Dipali Nevarekar

नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

EPFO ATM Card, Mobile App कधी होणार लॉन्च? पहा Withdrawal Limits बाबतचे अपाडेट्स

Dipali Nevarekar

Ministry of Labour, च्या सुत्रांच्या माहितीनुसार EPFO 3.0 द्वारा सेवा देण्यासाठी सध्या आरबीआय आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा सुरू आहे.

Vijay Hazare Trophy: IPL पूर्वी RCB साठी आनंदाची बातमी, विजय हजारे ट्रॉफीमध्ये या खेळाडूने दाखवले बॅट आणि बॉलने आपले कौशल्य

Amol More

बडोद्याच्या 301 धावांना प्रत्युत्तर देताना मध्य प्रदेशचा संपूर्ण संघ 40.2 षटकांत 217 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे बडोद्याने 84 धावांनी सहज विजय मिळवला. बडोद्यासाठी क्रुणाल पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कृणाल पांड्याने 5.5 षटकांत 27 धावांत 3 फलंदाज बाद केले.

Complainant Woman Molested By Police Officer: कर्नाटकमध्ये DYSP कार्यालयाच्या स्वच्छतागृहात पोलीस अधिकाऱ्याचा तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Bhakti Aghav

हिंदुसातन टाईम्स कन्नड वेबसाइटनुसार, पावागडा येथील एका महिलेने जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी डीवायएसपीच्या कार्यालयात भेट दिली तेव्हा ही घटना घडली. वृत्तानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने महिलेला कथितपणे कार्यालयातील वॉशरूमजवळील भागात नेले, जेथे त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.

HMPV Outbreak In China: चीनमध्ये पसरला नवीन HMPV व्हायरस! भारताने वाढवली खबरदारी; आरोग्य महासंचालनालय म्हणाले, 'काळजी करण्याची गरज नाही'

Bhakti Aghav

आरोग्य सेवा महासंचालनालयाचे (डीजीएचएस) अधिकारी डॉ. अतुल गोयल म्हणाले की, चीनमध्ये एचएमपीव्हीच्या प्रसाराबद्दल घाबरण्याची गरज नाही. त्यांनी सर्व श्वसन संक्रमणांच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे सुचवले आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

Advertisement
Advertisement