EPFO ATM Card, Mobile App कधी होणार लॉन्च? पहा Withdrawal Limits बाबतचे अपाडेट्स
Ministry of Labour, च्या सुत्रांच्या माहितीनुसार EPFO 3.0 द्वारा सेवा देण्यासाठी सध्या आरबीआय आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा सुरू आहे.
नोकरदार व्यक्तींसाठी आता EPFO पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुकर करणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान Union Labour and Employment Minister, Mansukh Mandaviya यांनी EPFO subscribers ना नवं मोबाईल अॅप आणि डेबिट कार्ड देण्याची प्रक्रिया मे-जून पर्यंत सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार, EPFO 2.0 मध्ये अपडेट करताना आयटी सिस्टिम अपग्रेड होणार आहे. सध्या ही प्रक्रिया जानेवारीच्या शेवटापर्यंत संपणार आहे. त्यानंतर EPFO 3.0 app मे - जून दरम्यान लॉन्च होणार आहे. त्यानंतर बॅंकिंगची सोय दिली जाणार आहे. ही प्रक्रिया लोकांना पैसे अधिक सुलभपणे काढता येणार आहे.
Ministry of Labour, च्या सुत्रांच्या माहितीनुसार EPFO 3.0 द्वारा सेवा देण्यासाठी सध्या आरबीआय आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा सुरू आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर subscribers ना debit cards दिली जातील आणि एटीएम द्वारा EPFO funds काढता येतील.
पैसे काढण्याचे लिमिट काय?
एटीएम कार्ड मिळालेल्या लोकांना त्यांच्या अकाऊंट मधून सारे पैसे काढता येणार नाहीत. पैसे काढण्याची मर्यादा ठरवली जाणार आहे. मात्र सकारात्मक बाब अशी आहे की या मर्यादेत पैसे काढण्यासाठी EPFO ची पूर्वपरवानगी आवश्यक नसते, जसे पूर्वी होते. सरकारच्या या उपक्रमामुळे EPFO सदस्यांना खूप फायदा होईल, त्यांना फॉर्म भरण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल आणि कार्यालयीन भेटींची गरज दूर होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)