Complainant Woman Molested By Police Officer: कर्नाटकमध्ये DYSP कार्यालयाच्या स्वच्छतागृहात पोलीस अधिकाऱ्याचा तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

हिंदुसातन टाईम्स कन्नड वेबसाइटनुसार, पावागडा येथील एका महिलेने जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी डीवायएसपीच्या कार्यालयात भेट दिली तेव्हा ही घटना घडली. वृत्तानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने महिलेला कथितपणे कार्यालयातील वॉशरूमजवळील भागात नेले, जेथे त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.

Woman Molested By Police Officer (फोटो सौजन्य- X/@AshwiniSahaya)

Complainant Woman Molested By Police Officer: कर्नाटकमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुगिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक (DySP) रामचंद्रप्पा यांच्या विरोधात कथित लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर प्रकरण समोर आले असून, एका महिला तक्रारदारासोबतच्या अयोग्य वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदुसातन टाईम्स कन्नड वेबसाइटनुसार, पावागडा येथील एका महिलेने जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी डीवायएसपीच्या कार्यालयात भेट दिली तेव्हा ही घटना घडली. वृत्तानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने महिलेला कथितपणे कार्यालयातील वॉशरूमजवळील भागात नेले, जेथे त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटक पोलिसांनी अद्याप या घटनेबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

पोलीस अधिकाऱ्याचे तक्रारदार महिलेसोबत लैंगिक गैरवर्तन, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now