ठळक बातम्या
Naxal Attack In Dantewada: दंतेवाडा मध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; 8 DRG जवान आणि ड्रायव्हरचा चा IED Blast मध्ये मृत्यू
Dipali Nevarekarआज 6 जानेवारी रोजी, दुपारी 14:15 वाजता, माओवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुटरू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडी स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले आहे.
HMPV Virus In Ahmedabad: कर्नाटकनंतर आता अहमदाबादमध्ये आढळला एचएमपीव्ही विषाणूचा तिसरा रुग्ण
Bhakti Aghavकर्नाटक (Karnataka) मध्ये एचएमपीव्ही (Human Metapneumovirus) च्या दोन प्रकरणांची पुष्टी केल्यानंतर गुजरातच्या अहमदाबादमध्ये एचएमपीव्ही प्रकरणाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील एचएमपीव्हीचा (HMPV Virus) हा पहिलाच रुग्ण आहे. अंदाजे 2 महिन्यांच्या मुलामध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे.
First Batch Of Kesar Mangoes: रत्नागिरीहून आलेल्या केसर आंब्याची पहिली पेटी मुंबईमधील APMC मार्केटमध्ये दाखल; व्यापाऱ्यांनी केली पूजा (Watch Video)
Bhakti Aghavयंदा आंब्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्याकडून केशर आंब्याची ही पहिली पेटी दाखल झाली आहे.
Justin Trudeau Likely to Resign: कॅनडामध्ये होणार मोठी राजकीय उलथापालथ? पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लवकरच राजीनामा देण्याची शक्यता, पक्षांतर्गत विरोध वाढला
Prashant Joshiट्रूडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. बुधवारी (8 जानेवारी) नॅशनल लिबरल पार्टीच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे, त्याआधी ट्रूडो यांच्या राजीनाम्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ताबडतोब आपले पद सोडणार की, नवीन नेता निवडला जाईपर्यंत वाट पाहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
What Is HMPV Virus? How Does It Spread? एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो? लक्षणांपासून कारणांपर्यंत आणि संक्रमणापासून उपचारांपर्यंत, मानवी मेटान्यूमोव्हायरसबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक
Shreya Varkeकर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) तीन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. चीनमध्ये सध्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) प्रकरणांमध्ये वाढ होत असून, हा विषाणू अनेक प्रदेशांमध्ये वेगाने पसरत आहे. दरम्यान एचएमपीव्ही म्हणजे काय, त्याची लक्षणे, उपचार आणि तो कसा पसरतो हे जाणून घेऊया. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखलेला एचएमपीव्ही हा नवीन शोधला गेलेला विषाणू नाही.
Digital Lounges: पश्चिम रेल्वे कार्यालयीन कामासाठी स्थानकांवर उभारणार डिजिटल लाउंज; डेस्क, चार्जर पॉइंट्स, वायफायसारख्या अनेक सुविधा मिळणार, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiयावर्षी प्रवासी सुविधा योजनेवर सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च केले जातील. यामध्ये प्रमुख टर्मिनस स्थानकांवर कार्यरत लोकांसाठी डिजिटल लाउंज तयार करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल लाउंजची ही संकल्पना भारतीय रेल्वेतील अशा प्रकारचा पहिला आणि अनोखा प्रयत्न आहे.
Avian Flu At Rescue Centre In Nagpur: नागपूरच्या बचाव केंद्रात एव्हियन फ्लूमुळे 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू; प्राणीसंग्रहालयातील अधिकारी सतर्क
Bhakti Aghavप्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) प्राणीसंग्रहालयांना खबरदारीचे उपाय लागू करण्याच्या सूचना देणारा सल्लागार जारी केला आहे.
Weather Forecast Tomorrow: कसे असेल मुंबईचे उद्याचे हवामान, जाणून घ्या
Shreya Varkeआज ६ जानेवारी २०२५ रोजी मुंबईचे तापमान २४.१५ अंश सेल्सिअस होते. दिवसाच्या अंदाजानुसार किमान तापमान अनुक्रमे २१.९९ अंश सेल्सिअस आणि २५.५१ अंश सेल्सिअस राहील. उद्या, मंगळवार, 7 जानेवारी 2025 रोजी मुंबईत किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.3 आणि 25.98 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.
Nagpur Water Cut: नागपूरमध्ये आज पाणीकपात; 6 जानेवारीला 12 तास पाणीपुरवठा विस्कळीत
Bhakti Aghavया काळात होणारी गैरसोय कमी करण्यासाठी बाधित भागातील रहिवाशांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील मदतीसाठी, 1800 266 9899 वर हेल्पलाइन उपलब्ध आहे.
PM Kisan Yojana: पती-पत्नी दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? जाणून घ्या, काय म्हणतात नियम
Shreya Varkeकेंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) सुरू केली आहे, ज्याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हप्ते जमा केले असून, १९ वा हप्ता लवकरच येणे अपेक्षित आहे. दरम्यान, नवरा-बायको दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल का, विशेषत: त्यांच्याकडे एकच शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
Reliance Jio IPO: मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ लॉन्च करणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? $120 अब्ज पेक्षा जास्त असू शकते मूल्य, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीया आयपीओमध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक नवीन शेअर विक्री आणि ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे शेअर जारी करतील. कंपनी तिच्या इश्यूमध्ये प्री-आयपीओ प्लेसमेंट क्लॉज देखील ठेवू शकते. या आईपीओद्वारे, रिलायन्स जिओचे मूल्य $ 120 अब्जपर्यंत पोहोचू शकते.
Guidelines For HMPV Virus: चीनमधील मानवी Metapneumovirus च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वाढवली खबरदारी; आरोग्य विभागाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
Bhakti Aghavसध्या चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे. लहान मुले आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये पसरलेल्या मेटाप्युमोव्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी (Guidelines For HMPV Virus) केली आहेत. पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरचा उद्रेक झाला होता. आता पुन्हा एकदा चीनमध्ये मेटाप्युमोव्हायरसने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या प्रकरणांना प्रतिसाद म्हणून, भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
Thane: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिली उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांना धमकी, शिवीगाळ केली; गुन्हा दाखल
Prashant Joshiआरोपीने सोशल मीडिया पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले आणि त्यांना धमकी दिली.
Ladki Bahin Yojana To Stop? महिलांसाठी असलेल्या लाडकी बहिण योजनेचा सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनेवर परिणाम; राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याची कृषिमंत्री Manikrao Kokate यांची माहिती
टीम लेटेस्टलीया योजनेमुळे, महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाला थोडा विलंब होईल, असे ते म्हणाले. कोकटे म्हणाले की, जसजशी संसाधने वाढतील, तशी ती दिली जाईल. ते म्हणाले, आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत आणि एकदा राज्याचे उत्पन्न वाढले की आम्ही पुढील चार ते सहा महिन्यांत कर्जमाफी योजना पुढे नेऊ.
HMPV Virus in India: कर्नाटकात मानवी मेटान्यूमोव्हायरसचे दोन रुग्ण आढळले, आरोग्य मंत्रालयाची पुष्टी
Shreya Varkeइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) दोन रुग्ण शोधून काढले आहेत. देशभरात श्वसनाच्या अनेक विषाणूजन्य रोगजनकांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियमित देखरेखीदरम्यान ही प्रकरणे समोर आली आहेत.
Sex Racket Bust in Bhopal: वेश्याव्यवसाय करणाऱ्या 18 स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकले छापे, ६८ जणांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले
Shreya Varkeगुप्त माहितीच्या आधारे भोपाळ पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या शहरातील १८ स्पा सेंटरवर अचानक छापे टाकले. २५० अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत ३५ महिलांसह ६८ जणांना ताब्यात घेण्यात आले, जे आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले. कमला नगर, एमपी नगर, हबीबगंज आणि बाग सेवानिया या आस्थापनांमध्ये अनैतिक कारवाया होत असल्याच्या अनेक तक्रारींनंतर या ठिकाणी छापे टाकण्यात आले.
Infosys Salary Hike Deferred: इन्फोसिसने वार्षिक पगारवाढ FY25 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पुढे ढकलली; नोव्हेंबर 2023 मध्ये वाढला होता शेवटचा पगार
टीम लेटेस्टलीपगारवाढ नसतानाही डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसचे मार्जिन कमी होईल, असे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या प्री-अर्निंग नोटमध्ये म्हटले आहे. सुट्ट्यांमुळे कामाचे दिवस कमी असल्याने असे होणार आहे.
Kaithal Shocker: कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले, दोघांची प्रकृती चिंताजनक; ही घटना सीसीटीव्हीत कैद
Shreya Varkeहरियाणातील कैथल जिल्ह्यात एका व्यक्तीने कारमध्ये पाच जणांना चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिका धान्य बाजारात शनिवारी ही घटना घडली. जिथे कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच तरुणांना धडक दिली. ही संपूर्ण घटना अवघ्या 5 सेकंदात घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
1st Case of HMPV in India: चीनमध्ये कहर करणाऱ्या एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसचा भारतात प्रवेश; बंगळुरू येथील 8 महिन्यांच्या बाळाला झाली लागण
Prashant Joshiएचएमपीव्ही मुख्यतः मुले आणि वृद्धांना लक्ष्य करतो. चीनमध्ये हा विषाणू प्रामुख्याने मुलांमध्ये आढळून आला आहे. त्याची लक्षणे कोरोना सारखीच आहेत. यामध्ये सर्दी-खोकला यांचाही समावेश आहे.
Digital Scam: लोकप्रिय युट्युबर Ankush Bahuguna ठरला सायबर फसवणुकीचा शिकार; 40 तास होता डिजिटल अरेस्टमध्ये, सोशल मिडियाद्वारे शेअर केली घटना (VIDEO)
Prashant Joshiअंकुशच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्यामुळे त्याचे पैसे तर गेलेच मात्र, मानसिक आरोग्याचे नुकसान झाले. आता डिजिटल अटक घोटाळ्याचा बळी ठरलेला अंकुश लोकांना जागरुक करत आहे, जेणेकरून त्याच्यासारखा दुसरा कोणी या घोटाळ्याला बळी पडू नये.