Guidelines For HMPV Virus: चीनमधील मानवी Metapneumovirus च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वाढवली खबरदारी; आरोग्य विभागाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
सध्या चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे. लहान मुले आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये पसरलेल्या मेटाप्युमोव्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी (Guidelines For HMPV Virus) केली आहेत. पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरचा उद्रेक झाला होता. आता पुन्हा एकदा चीनमध्ये मेटाप्युमोव्हायरसने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या प्रकरणांना प्रतिसाद म्हणून, भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
Guidelines For HMPV Virus: चीनमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरस (Human Metapneumovirus) प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. मेटाप्युमोव्हायरस विषाणूमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसतात. सध्या चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे. लहान मुले आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये पसरलेल्या मेटाप्युमोव्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी (Guidelines For HMPV Virus) केली आहेत. पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरचा उद्रेक झाला होता. आता पुन्हा एकदा चीनमध्ये मेटाप्युमोव्हायरसने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या प्रकरणांना प्रतिसाद म्हणून, भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्गदर्शक तत्त्वे जारी -
चीनकडून आलेल्या अहवालानंतर, आरोग्य सेवा संचालक नितीन अंबाडेकर यांनी रविवारी राज्यभरातील उपसंचालक, सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना श्वसन संक्रमण आणि इन्फ्लूएंझा सारख्या आजारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश जारी दिले आहेत. चीनमध्ये एचएमपीव्हीच्या उद्रेकानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जनतेला घाबरू नका असे आवाहन करताना विभागाने सतर्क राहण्याचा आणि सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. नितीन अंबाडेकर यांनी स्वच्छता नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात HMPV चे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नसले तरी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा -1st Case of HMPV in India: चीनमध्ये कहर करणाऱ्या एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसचा भारतात प्रवेश; बंगळुरू येथील 8 महिन्यांच्या बाळाला झाली लागण)
HMPV चा प्रसार रोखण्यासाठी अशी खबरदारी -
खोकताना किंवा शिंकताना रुमाल वापरा.
हात नियमितपणे साबणाने धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.
हायड्रेटेड राहा आणि पौष्टिक अन्न खा.
टिश्यू पेपर किंवा रुमाल पुन्हा वापरणे टाळा.
आजारी व्यक्तींच्या जवळच्या संपर्कापासून दूर रहा.
डोळे, नाक किंवा तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा.
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वत: ची औषधोपचार टाळा.
महाराष्ट्रात आतापर्यंत HMPV संक्रमण नाही -
आरोग्य विभागाने चीनमध्ये नोंदवलेल्या एचएमपीव्ही प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभागाकडून या विषाणूला रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत HMPV चे एकही रुग्ण आढळलेले नाही. नॅशनल सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या संचालकांच्या मते, एचएमपीव्ही हा एक हंगामी आजार आहे, जो सामान्यत: हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस होतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)