Justin Trudeau Likely to Resign: कॅनडामध्ये होणार मोठी राजकीय उलथापालथ? पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लवकरच राजीनामा देण्याची शक्यता, पक्षांतर्गत विरोध वाढला

ट्रूडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. बुधवारी (8 जानेवारी) नॅशनल लिबरल पार्टीच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे, त्याआधी ट्रूडो यांच्या राजीनाम्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ताबडतोब आपले पद सोडणार की, नवीन नेता निवडला जाईपर्यंत वाट पाहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Justin Trudeau (PC-Wikimedia Commons)

कॅनडामध्ये (Canada) मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) आपली खुर्ची सोडणार आहेत. द ग्लोब अँड मेल या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, जस्टिन ट्रूडो सोमवारी (6 जानेवारी) राजीनामा देऊ शकतात. लिबरल पक्षातील वाढता कलह आणि सदस्यांकडून त्यांच्यावर टाकण्यात येत असलेल्या दबावामुळे ट्रुडो यांनी हा मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. अहवालानुसार, लिबरल पक्षात असंतोष आणि भांडण वाढत आहे. या प्रकरणात, लिबरल पक्षाच्या अंतर्गत घडामोडींची माहिती असलेल्या तीन प्रमुख स्त्रोतांचा हवाला देऊन असे सांगण्यात आले आहे की, ट्रूडो आपला राजीनामा जाहीर करू शकतात.

ट्रूडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. बुधवारी (8 जानेवारी) नॅशनल लिबरल पार्टीच्या संसदीय पक्षाची बैठक होणार आहे, त्याआधी ट्रूडो यांच्या राजीनाम्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ताबडतोब आपले पद सोडणार की, नवीन नेता निवडला जाईपर्यंत वाट पाहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी या विषयावर अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांच्याशी चर्चा केली आहे.

राजीनाम्याचे कारण-

एकेकाळी कॅनडाचे पुरोगामी नेते म्हणून ओळखले जाणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, यांनी आपली घसरलेली लोकप्रियता वाढवण्यासाठी भारतविरोधी अजेंडा स्वीकारून दोन्ही देशांमधील संबंध बिघडवले. त्यांनी खलिस्तानी प्रचारालाही खतपाणी घातले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. आता आज ट्रुडो यांच्या नेतृत्वाला अनेक आघाड्यांवरून घेराव घालण्यात आला आहे. समीक्षकांचे म्हणणे आहे की ट्रूडो, यांनी देशांतर्गत आव्हानांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अनेक वाद निर्माण केले. (हेही वाचा: International Students in Canada: पुढील वर्षी 7 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागेल; लाखो भारतीय मुलांचे भविष्य अंधारात, जाणून घ्या कारण)

जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुढची निवडणूक जिंकणे कठीण असल्याचे लिबरल पक्षाच्या सदस्यांचे मत आहे. त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी वाढत असून या नाराजीचा परिणाम म्हणजे खासदारांनी त्यांना उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली आहे. काही काळापूर्वी त्याला हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली होती.

2015 मध्ये झाले पंतप्रधान-

जस्टिन ट्रूडो 2015 मध्ये पहिल्यांदाच निवडणुका जिंकून कॅनडात सत्तेवर आले. यानंतर त्यांनी 2019 आणि 2021 मध्येही लिबरल पक्षाला विजय मिळवून दिला. पण जसजसा त्यांचा कार्यकाळ वाढत गेला तसतसे त्यांचे सरकार घोटाळे आणि वादात अडकले. सध्याच्या परिस्थितीत, ओपिनियन पोलनुसार, ट्रूडो हे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे यांच्यापेक्षा 20 गुणांनी पिछाडीवर आहेत. ही घसरण त्यांच्या राजकीय पकडातील एक मोठी कमकुवतपणा दर्शवते. ऑक्टोबरच्या अखेरीस देशात निवडणुका होणार आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यास तेथे लवकरच निवडणुका घेण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now