Thane: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिली उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांना धमकी, शिवीगाळ केली; गुन्हा दाखल

आरोपीने सोशल मीडिया पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले आणि त्यांना धमकी दिली.

Eknath Shinde | (Photo Credit- X)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकावल्याप्रकरणी ठाण्यातील एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी सांगितले की, 26 वर्षीय आरोपीविरुद्ध काही पुरावे सापडले आहेत, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाने उपमुख्यमंत्री शिंदे यांना इंस्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ करत धमकी दिली. शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव हितेश प्रकाश धेंडे असून, तो ठाणे येथील रहिवासी आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.

आरोपीने सोशल मीडिया पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले आणि त्यांना धमकी दिली. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 133, 352, 351(1), 356 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Sanjay Gaikwad Viral Video: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली; मतदारांना जाहीर शिवीगाळ)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now