ठळक बातम्या
Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानची प्रकृती स्थिर; अभिनेत्याला 2 दिवसांत मिळणार डिस्चार्ज
Bhakti Aghavलीलावती रुग्णालयातील एका डॉक्टरने माध्यमांना सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची चौकशी सुरू असताना, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की गेल्या काही दिवसांपासून खानच्या निवासस्थानी फरशी पॉलिश करण्याचे काम सुरू होते.
How To Buy India vs England T20I Series Tickets: भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून होणार सुरुवात, कधी अन् कुठे करणार तिकिट बुक? किती आहे किंमत? एका क्लिकवर घ्या जाणून
Nitin Kurheमालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
Saif Ali Khan Attacked: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आला समोर, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु
Amol Moreमुंबई पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित दिसले आहेत. मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दावा केला की, आरोपी त्यापैकी एक असू शकतो. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.
NEET-UG 2025: नीट यूजी परीक्षा यंदा पेन आणि पेपर मोड मध्ये होणार
Dipali Nevarekar200 प्रश्नांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 180 प्रश्न निवडणं आवश्यक आहे.
Pune Firing Case: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईलवर गेम खेळताना दोन मित्रांमध्ये वाद; मित्रावर गावठी कट्ट्यातून केला गोळीबार
Bhakti Aghavही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत असलेल्या कॉलेजजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. आरोपीची ओळख पटली असून निलेश जाधव, असं या आरोपीचं नाव आहे. तो दाभाडीचा रहिवासी आहे.
Team India New Batting Coach: टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकामध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआय करू शकते मोठी घोषणा
Nitin Kurheटीम इंडियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर, बीसीसीआय कोचिंग युनिटमध्ये मोठे बदल करू शकते. संघात नवीन फलंदाजी प्रशिक्षक येऊ शकतो.
Tata Mumbai Marathon 2025 साठी मध्य रेल्वे, बेस्ट बस कडून विशेष सेवा चालवली जाणार
Dipali Nevarekarमॅरेथॉन दरम्यान A-78, A-89, A-105, A-106, A-108, A-112, A-123, A-132 आणि A-155 या मार्गांसाठी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.
Rohit Sharma And Virat Kohli Stats In Domestic Cricket: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी आहे कामगिरी, 'हिटमॅन' आणि 'रन मशीन'ची आकडेवारी घ्या जाणून
Amol Moreभारतीय खेळाडूंना पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले. टीम इंडियाचा सध्याचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी केली आहे ते जाणून घेऊया.
India vs England, 1st T20I Match Stats: कोलकाताच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? आकडेवारीमध्ये घ्या जाणून
Nitin Kurheमालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
Aditya Thackeray On Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा
Bhakti Aghavआदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सैफ अली खानवर घुसखोरी आणि चाकू हल्ला धक्कादायक आहे. त्याची प्रकृती स्थिर असून तो बरा होत आहे, हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला. कठीण काळ संपून तो लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावा, अशी आम्ही प्रार्थना करतो. तथापि, हे घडले ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
Jasprit Bumrah On His Bed Rest News: 'खोट्या बातम्या पसरवणे सोपे आहे पण...', जसप्रीत बुमराहने घेतला खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा क्लास
Amol Moreअलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या सामन्यात बुमराहच्या पाठीत दुखापत झाली होती, त्यानंतर सामन्याच्या मध्यभागी भारतीय गोलंदाजाने स्कॅनसाठी धाव घेतली.
Buldhana Hair Loss: टक्कल व्हायरस लग्नास अडथळा, तरुणाईचे विवाह रखडले; केस गळणे, टक्कल पडणे समस्येने गावकरी हैराण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBuldhana Baldness Virus: बुलढाणा येथे विविध गावांमध्ये उद्भवलेल्या केसगळती, टक्कल पडणे या कारणांमुळे तरुणाई चिंतित आहे. टक्कल व्हायरस उद्भवल्याने अनेकांचे विवाह रखडले आहेत. आयसीएमआर आणि जिल्हा आरोग्य विभाग या विचित्र समस्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.
Milk Adulteration: राज्यात दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास होणार कठोर कारवाई; तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
टीम लेटेस्टलीअन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन, राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
WPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघात केला बदल, दुखापत सोफी मोलिनेक्सची जागा चार्ली डीनला केले दाखल
Nitin Kurheमहिला प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियन स्टार सोफी मोलिनेक्सची जागा घेण्यासाठी फ्रँचायझीने इंग्लंडची क्रिकेटपटू चार्ली डीनला करारबद्ध केले आहे. 2023-24 च्या आवृत्तीत मोलिनेक्स बंगळुरू फ्रँचायझीचा भाग होती.
Saif Ali Khan Attacked: आरोपी सैफच्या घरात कसा घुसला? दोघांपैकी एकाची ओळख पटली; मुंबई पोलिसांनी केला खुलासा
Bhakti Aghavचोरीच्या उद्देशाने घरात घुसलेला तो अज्ञात व्यक्ती त्याच्या मुलाच्या खोलीतून आत शिरला आणि मोलकरणीशी भांडू लागला. मोलकरणीला वाचवण्यासाठी आलेला सैफ अली खानही अपघाताचा बळी ठरला. हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. त्याला अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली.
CM Devendra Fadnavis on Saif Ali Khan Attack Case: ' केवळ सैफ च्या हल्ल्यावरून मुंबई शहर असुरक्षित' म्हणणं चूकीचं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Dipali Nevarekar"अशा घटना घडतात आणि त्यांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे; परंतु अशा घटनांच्या आधारे मुंबईला असुरक्षित म्हणणे चुकीचे आहे," असे फडणवीस म्हणाले आहेत.
Baramati Shocker: अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलाची केली हत्या; भिंतीवर डोके आपटून गळा आवळला, बारामतीजवळील धक्कादायक घटना
Prashant Joshiपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी मुलगा अभ्यास करत नसल्याने वडील त्याला ओरडले होते. घरातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांत भांडण झाले होते. याच भांडणामध्ये आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटले व नंतर त्याचा गळा आवळला.
Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Amol Moreराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाय प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात, महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण?
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी, स्टार गोलंदाज तंदुरुस्त; मैदानात परतण्यास सज्ज
Nitin Kurheदुखापतीतून सावरल्यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव मैदानात परतला आहे. कुलदीपने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चायनामन गोलंदाज तंदुरुस्त होणे ही भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे.
Agra Bakery Blast: उत्तर प्रदेशातील मेडले बेकर्समध्ये स्फोट, कामगार गंभीर जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील आग्रा येथील मेडले बेकर्समध्ये आज, 16 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हरिपर्वत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्प विहार कॉलनीत असलेल्या बेकरीमध्ये झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून डझनाहून अधिक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. स्फोटाचे नेमके कारण तपासले जात असले तरी गॅस सिलिंडरचा स्फोट कारणीभूत असावा, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे.