NEET-UG 2025: नीट यूजी परीक्षा यंदा पेन आणि पेपर मोड मध्ये होणार

200 प्रश्नांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 180 प्रश्न निवडणं आवश्यक आहे.

NEET UG | Representational Image (File Photo)

नीट यूजी परीक्षा यंदा पेन आणि पेपर मोड मध्ये होणार आहे. ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच शिफ्ट मध्येही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. NTA ने असेही जाहीर केले की सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये BAMS, BUMS, आणि BSMS अभ्यासक्रमांसह प्रत्येक शाखेतील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकसमान NEET (UG) असेल. परीक्षा 3 तास 20 मिनिटांच्या कालावधीसाठी घेतली जाणार आहे. यात 200 प्रश्न आहेत, त्यापैकी विद्यार्थ्यांना 180 प्रश्नांचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्याला चार गुण दिले जातात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण नकारात्मक असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement