तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येस (Tunisha Sharma Suicide Case) प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या टेलिव्हिजन अभिनेता शीझान खानला (Sheezan Khan) कठोर शिक्षा करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गुरुवारी केली. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांचे वक्तव्य आले. आम्ही तुनिशाच्या आईशी भेटलो आणि अर्धा तास बोललो. तिला न्याय हवा आहे आणि ती आरोपी शीझान खानला कठोर शिक्षा हवी आहे. आम्ही तिला तसे वचन दिले आहे. त्याने तिचा विश्वासघात केला असून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा लोकांना फाशी देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्मा शनिवारी तिच्या सुरू असलेल्या 'अलिबाबा-दास्तान-ए-काबुल' शोच्या सेटवर मृतावस्थेत आढळून आली. शोमधील तिचा सहकलाकार शीझान खान, जो तिच्यासोबत कथित संबंधात होता, त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि रविवारी वालीव पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या कोठडीत 30 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. हेही वाचा Pathaan: ‘पठाण’ चित्रपटातील वादग्रस्त भाग हटवण्याच्या सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिल्या सूचना, जाणून घ्या सविस्तर माहिती
TV actor Tunisha Sharma death case | Mumbai: Union minister Ramdas Athawale meets family members of deceased actor Tunisha Sharma. pic.twitter.com/4vKThmNSkK
— ANI (@ANI) December 29, 2022
गुरुवारी वनिता शर्मा, तुनिषाचा मामा पवन शर्मा आणि ड्रायव्हरचे जबाबही पोलीस नोंदवणार आहेत.वालीव पोलिसांनी बुधवारी वसई न्यायालयात सांगितले की, तुनिषा शर्माच्या आत्महत्येचा तपास शीझान खानच्या फोनवरून काही 'डिलीट केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्स' आणि तिच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्यांच्यात झालेल्या '15 मिनिटांच्या संभाषणावर' केंद्रित आहे.