Bigg Boss Marathi 2 Episode 63 Preview (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 ( Bigg Boss Marathi 2) मध्ये कधी आपल्या बंडखोरीमुळे तर कधी खिलाडूपणाने सदैव चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे शिवानी सुर्वे (Shivani Surve) . शिवानीच्या घरवापसीमुळे बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा दोन प्रबळ गट पडून खेळात रंगत यायला सुरुवात झाली होती. हीच बाब लक्षात घेऊन घरात पाहुणी म्हणून पुन्हा आलेल्या शिवानीला पुन्हा एकदा सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. पण यानंतर लगेचच तिने आपले पूर्वरूप दाखवायला सुरुवात केली होती. कधी  टास्क दरम्यान रडून ती स्वतःला दुर्बल दाखवू लागली तर कधी उगाचच घरातील सदस्यांशी पंगा घेत तिने दादागिरी करायला सुरुवात केली. शिवानीच्या याच वागणुकीमुळे तिला आज विकेंड च्या डाव (Weekend Cha Daav) मध्ये महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjarkar) रागाचा सामना करावा लागणार आहे. Bigg Boss Marathi 2 स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचा पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश?

शिवानी आणि हिना मध्ये झालेल्या एका भांडणात शिवानी हिनाला तू नॉमिनेटेड आहेसच त्यामुळे आता तशीच सरळ घरबाहेर निघुन जा असे म्हणते, यावर हिना चिडून तिला हे तू मला सांगायची गरज नाही या शब्दात उत्तर देते पण  शिवानी आपण माफी मागणार नाही अशीच भूमिका घेते. तिच्या या च विधानामुळं आज मनजरा तिच्यावर चिडलेले पाहायला मिळणार आहेत.मागी वेळेस जेव्हा घरातील सदस्यांना उद्देशून वीणा हेच वाक्य म्हणाली होती तेव्हा घरातील सर्व सदस्यांनी तिच्यारझोड घेतली ओटी पण जेव्हा शिवानी हिनाला निघून जाण्याचे म्हणत होती तेव्हा कोणीच तिला रोखले नाही. यातून पुन्हा एकदा हिना हा घरातल्यांचे टार्गेट असल्या सिद्धी होत आह असेही मांजरेकर म्हणाले.

पहा आजच्या भागाची झलक

दरम्यान, या आठवड्यात घरातील सदस्यांचे वाद, सात/बारा या साप्ताहिक कार्यात झालेली बाचाबाची, आणि एकूणच सदस्यांच्या वागणुकीचा आढावा घेण्यासाठी आज विकेंडच्या डाव मधून महेश मांजरेकर कोणाची आणि कशी शाळा घेतात हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला मराठी बिग बॉस!