सचिन कुंडलकर photo credit facebook

सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्स (Netflix)वरील पहिल्या भारतीय वेब सीरिजला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता नव्या चित्रपटांसाठी नेटफ्लिक्स(Netflix) कडून घोषणा करण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात येत्या वर्षातील भारतीय कथांवरील चित्रपटांची घोषणा नेटफ्लिक्सने(Netflix) केली आहे. यामध्ये सचिन कुंडलकरच्या ' कोबाल्ट  ब्लु' (Cobalt Blue) या कादंबरीचाही समावेश झाला आहे. त्यामुळे सचिन कुंडलकर दिग्दर्शित नवा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

सचिन कुंडलकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून नव्या सिनेमाची माहिती दिली आहे. नेटफ्लिक्स(Netflix)साठी 'कोबाल्ट ब्लू' कादंबरीवर हिंदी चित्रपटासाठी सचिन कुंडलकर पटकथा लिहीत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन देखील सचिन करणार आहे.

नेटफ्लिक्सकडून Celebrating India या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये See What's Next: Asia याद्वारा आगामी ८ नवे सिनेमे आणि एका वेब सिरीजची घोषणा करण्यात आली आहे. 'टाईपरायटर' ही सीरिज आहे तर बुलबुल, कोबाल्ट ब्लु, १५ ऑगस्ट, हॉटेल मुंबई, चॉपस्टिक्स, अपस्टार्टर्स, म्युझिक टीचर, फायर ब्रँड हे ८ सिनेमे आगामी वर्षभरात पाहता येणार आहेत. या सिनेमांमध्ये मिथिला पालकर, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी सह अनेक मराठमोळे चेहरे झळकणार आहे.