Keerthy Suresh in Penguin (Photo Credts: Instagram)

कीरथि सुरेश (Keerthy Suresh) ही अभिनेत्री पेंग्विन (Penguin) सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पर्दापण करणार आहे. परंतु, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे पर्दापणातील पहिलाच सिनेमा हा सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यामुळे हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचे निर्माते कार्तिक सुब्बाराज (Karthik Subbaraj) यांनी आपले बहुतांश सिनेमांचे थिएटर्स रिलीज रद्द करुन OTT प्लॅटफॉर्मवर सिनमे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. पेंग्विन हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम आज 19 जून रोजी रिलीज झाला. सिनेमा रिलीज होऊन 24 तास होत नाहीतर सिनेमाच्या पायरेसी लिंक्स (Piracy Links) इंटरनेटवर उपलब्ध झाल्या आहेत.

इंटरनेटच्या सर्च इंजिनमध्ये Penguin Movie Full HD Available, Penguin movie download on Filmyzilla, Penguin TamilRockers download या किडवर्ड्सने सिनेमा उपलब्ध होत आहेत. या हा सिनेमा 1080p HD, 480p, 720p अशा वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये डाऊनलोड करता येत आहे.

कीरथि सुरेशच्या या सिनेमाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रीया मिळत आहेत. प्रेक्षकांना या सिनेमाच्या लिंक्स टोरेन्टवर उपलब्ध होत असून सुब्बाराज प्रॉडक्शनला ही पायरेसीचे ग्रहण लागले आहे. पेग्विंन हा एक मिस्ट्री थ्रिलर फिल्म असून ईश्वर कार्तिक यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान पायरेसीचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमागृह बंद असल्याने लोक ऑनलाईन माध्यमातून आपले मनोरंजन करत आहेत. त्यामुळे अनेक सिनेमे पायरेसीला बळी पडत आहेत. म्हणूनच पायरेसीवर खात्रीशीर उपाय शोधून काढण्याची गरज भासू लागली आहे.