Ser Sivaraj Hai (Pic Credit - You Tube)

रामायण, महाभारतात आजवर अनेक राजांनी आपली भूमिका चोख निभावली. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. अशा महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असे म्हटले की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे कुठले नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती (Shiv Jayanti) आहे. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे गुणगान प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार 'सेर सिवराज है' (Ser Sivaraj Hai) या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे. दिव्य कुमारने (Divya Kumar) हिंदी मराठी विश्वात गायलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

नावाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी गात त्याने मराठीतील 'फत्तेशिकस्त', 'कट्यार काळजात घुसली' या सारख्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बुलंद आवाज दिला. आता महाराजांचे गुणगान गाणारे आणि महाराजांच्या साम्राज्यातले महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित रचलेले हे गीत दिव्य कुमारने गायले असून 'मानस मराठी' प्रस्तुत असून संजय पटेल निर्मित आहे. सेर सिवराज है हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नवे कोरे गीत एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

दिग्दर्शक म्हणून ज्ञानेश्वर राजकुले यांनी बाजू गाण्याची उत्तम बाजू सांभाळली. 'सेर सिवराज है' हे गाणे सुप्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांनी स्वरबद्ध केले आहे. माझा मल्हार, हे गजानन या गाण्यांचे दिग्दर्शन संगीत दिग्दर्शक प्रसाद शिरसाठ यांनी केले असून देव महादेव, तू जोगवा वाढ ही गाणी अद्याप प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. या गाण्याचे संगीत संयोजनही प्रसाद शिरसाठ यांनी केले असून गाण्याचे बोल आणि दिग्दर्शनातही त्यांचा खारीचा वाटा आहे. हेही वाचा Bal Shivaji: छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास येणार 'बाल शिवाजी' चित्रपटातून शिवभक्तांच्या भेटीस, लवकरच चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याची दिग्दर्शक रवी जाधवांची माहिती

याशिवाय कविभूषण, योगेश खरात, स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाठ यांचा देखील गाण्याचे बोल लिहिण्यात वाटा आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग 'अपोस्ट्रॉफी स्टुडिओ' नाशिक, 'डॉन स्टुडिओ' पुणे आणि 'साउंड आयडियाज स्टुडिओ' मुंबई येथे पार पडले. या गाण्यात पुण्याचा लाडका रिल्स स्टार ऋषिकेश कणेकर, चैताली जाधव, अखिल सुगंध, हर्षवर्धन निकम यांनी भूमिका साकारल्या आहेत. महाराजांच्या जयंतीनिमित्त हे नवे गाणे 'मानस मराठी' युट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार असून शिवभक्तांना पर्वणीच ठरणार आहे.