Wedding cha SHINEMA Song (Photo Credits You Tube)

 Ugichach Kay Bhandaychay Song: लेखक, गायक, संगीतकार, सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) आता 'वेडिंगचा शिनेमा' (Wedding Cha Shinema) याद्वारा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'वेडिंगचा शिनेमा' या सिनेमाच्या टीझरला रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला त्यानंतर आता या सिनेमाचं रीलीज करण्यात आलेलं गाणं देखील लोकांच्या ओठांवर बसलं आहे. 'उगीचच काय भांडायचंय? या गाण्यालाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

'उगीचच काय भांडायचंय? 

आपल्या आवडत्या व्यक्तीसोबतच आपला हक्काने झगडा होत असतो. आपल्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण नेहमीच आणि उगीचच भांडत असतो, त्या भांडण्याला काही कारण पण नसते, पण उगीचच आपण सगळ्यांन बरोबर भांडत असतो. हेच या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. 'उगीचच काय भांडायचंय? हे गाणंदेखील सलील कुलकर्णी यांनी लिहले असून त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.